महाराष्ट्रात लोकशाहीचा गुजरात पॅटर्न सुरू; नाना पटोलेंचे टीकास्त्र

महाराष्ट्रात लोकशाहीचा गुजरात पॅटर्न सुरू; नाना पटोलेंचे टीकास्त्र

शेतमालाला भाव मिळत नसल्याने शिंदे-फडणवीस सरकारवर पटोलेंनी जोरदार टीकास्त्र सोडले

कल्पना नलसकर | नागपूर : सरकारविरोधात बोलाल तर जीवे मारण्याचा प्रयत्न होतो, असे विधान अशोक चव्हाण यांनी केले होते. या विधानाचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी समर्थन केले आहे. तसेच, शेतमालाला भाव मिळत नसल्याने शिंदे-फडणवीस सरकारवर पटोलेंनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. भाजप शेतकरी विरोधी आहे. महाराष्ट्रात लोकशाहीचा गुजरात पॅटर्न सुरू करण्यात आला आहे. विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न होत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

महाराष्ट्रात लोकशाहीचा गुजरात पॅटर्न सुरू; नाना पटोलेंचे टीकास्त्र
'आधे इधर गए... आधे उधर गए.. अकेले असरानी बच गएं'

भाजप शेतकरी विरोधी आहे. जेव्हा शेतकऱ्यांचा पीक हाती येतो, तेव्हाच आयात शुल्कात कमी करून मोठ्या प्रमाणावर आयात करतात आणि शेतकऱ्यांना दर मिळाला नाही पाहिजे, यांच्या व्यापारी मित्रांना फायदा झाला पाहिजे असे यांचे धोरण असते. सध्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा कापूस घरी पडलेला आहे. त्याला कीड लागत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. कापूस, तूर, धान, कांदा या सर्व पिकांवर आघात करण्याचे काम भाजप करत आहे, अशी टीका पटोले यांनी केली आहे.

काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्येच आम्ही असे ठरवले आहे की जे जे भाजपच्या विरोधात लढायला तयार असतील, त्या सर्वांना आम्ही सोबत घेऊ. भाजपने लोकशाही धोक्यात आणली आहे. न्यायव्यवस्था आणि प्रशासनामध्ये त्यांचा हस्तक्षेप आहे. राष्ट्रीय अधिवेशनामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट आणि मांडलेली आहे. त्यामुळे भाजप विरोधातल्या सर्व लोकांना राष्ट्रीय पक्षांना सोबत घेऊन देशाचा संविधान आणि देश वाचवण्यासाठी काँग्रेसने भूमिका घेतलेलीच आहे. जे जे या विचाराने सोबत येतील त्या सर्वांना सोबत घेऊन जाण्याची काँग्रेसची भूमिका आहे, असे त्यांनी सांगितले.

निवडणुका एकत्रित लढणार आहात प्रचार सभा ही एकत्रित घेणार का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, महाविकास आघाडी म्हणून आम्ही जेव्हा काम करतो आहे. तेव्हा भाजप लोकशाहीमध्ये जी क्रूरता निर्माण करत आहे, त्या विरोधात एकत्रित लढण्यास आमचा कोणालाही विरोध नसावा.

अशोक चव्हाण योग्यच बोलले. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा जनतेचे प्रश्न उचलतो. तेव्हा केंद्र आणि राज्य सरकार आमच्या विरोधात आरोप लावते चौकशा करते. आमच्या मतदारसंघातील कामांवर बंदी आणली जाते. महाराष्ट्रात लोकशाहीचा गुजरात पॅटर्न सुरू करण्यात आला आहे. विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न होत आहे आणि त्यावरची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे. त्याचा मी समर्थन करतो. होळीच्या सर्वांना शुभेच्छा. या होळीमध्ये सत्तेत बसलेल्या सदबुद्धी यावी अशी होळी मातेला माझी प्रार्थना आहे, असेही नाना पटोले यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com