मोदींनी पंतप्रधान म्हणून नाही तर आरएसएसचे प्रचारक म्हणून केले भाषण; पटोलेंचे टीकास्त्र

मोदींनी पंतप्रधान म्हणून नाही तर आरएसएसचे प्रचारक म्हणून केले भाषण; पटोलेंचे टीकास्त्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणाची सर्वत्र चर्चा आहे. यावरुन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणाची सर्वत्र चर्चा आहे. त्यात त्यांनी पुढच्या वर्षी पुन्हा येणार असल्याचे सांगितले. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजय आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचे 'भविष्यवाणी' म्हणून याकडे पाहिले जात आहे. यावरुन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.

मोदींनी पंतप्रधान म्हणून नाही तर आरएसएसचे प्रचारक म्हणून केले भाषण; पटोलेंचे टीकास्त्र
कोणाला समर्थन? अजित पवार गटाच्या भेटीनंतर नवाब मलिकांचा मोठा निर्णय

स्वातंत्र्य दिनानिमित्त काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम आणि उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाच्या वतीने भव्य तिरंगा गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड देखील सामील झाल्या होत्या.

कार्यकर्त्यांना संबोधित करताना नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या की निवडणुकीच्या तयारीला लागा आणि आणि जर भारताला हुकूमशाहीपासून वाचवायचा असेल तर 15 ऑगस्ट 2024 ला लाल किल्ल्यावर इंडिया अलायन्समध्ये स्वातंत्र्य दिन साजरा झाला पाहिजे, असे त्यांनी म्हंटले आहे.

तसेच, आज लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जे भाषण झाले ते देशाचे पंतप्रधान म्हणून नाही तर आरएसएसचे प्रचारक म्हणून त्यांनी भाषण केले, अशी जोरदार टीकाही पटोलेंनी केली.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

आज घराणेशाही आणि तुष्टीकरणाने आपला देश उद्ध्वस्त केला आहे. राजकीय पक्षाचा कारभार एकच कुटुंब कसे काय? त्यांच्यासाठी त्यांचा जीवनमंत्र आहे की कुटुंबाचा पक्ष, कुटुंबासाठी आणि कुटुंबासाठी. लोकशाहीच्या बळावर कुटुंबवादापासून मुक्तता आवश्यक आहे. यासोबतच पुढील निवडणुकीतही आपल्या पक्षाच्या विजयाचा दावा मोदींनी केला. बदलामुळे मला आणखी एक संधी मिळाली. मी पूर्ण करेन. तुमचे प्रत्येक स्वप्न. मी पुढच्या १५ ऑगस्टला पुन्हा येईन, असे पंतप्रधान मोदींनी म्हंटले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com