नागालँडमध्ये भाजपाला राष्ट्रवादीची साथ; कॉंग्रसने एका वाक्यात दिली प्रतिक्रिया

नागालँडमध्ये भाजपाला राष्ट्रवादीची साथ; कॉंग्रसने एका वाक्यात दिली प्रतिक्रिया

नागालँडमध्ये भाजपा- एनडीपीपी आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. या दोन्ही पक्षांनी नागालँडमध्ये सरकार स्थापन केले.

मुंबई : नागालँडमध्ये भाजपा- एनडीपीपी आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. या दोन्ही पक्षांनी नागालँडमध्ये सरकार स्थापन केले. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसही सत्तेत सहभागी होणार आहे. पक्षाध्यक्ष शरद पवारांशी चर्चा केल्यानंतर भाजपासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागालँडमध्ये आता भाजपसोबत राष्ट्रवादीची युती सहभागी होणार आहे. यावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तो त्यांचा पक्षाचा निर्णय आहे. ते योग्य निर्णय घेतील, असे त्यांनी म्हंटले आहे.

नागालँडमध्ये भाजपाला राष्ट्रवादीची साथ; कॉंग्रसने एका वाक्यात दिली प्रतिक्रिया
'या' जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार; फडणवीसांची माहिती

महाराष्ट्राने कर्ज काढून बुलेट ट्रेनमध्ये भरली. अशा प्रकारची उधळपट्टी सुरु आहे. म्हणून कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा अस म्हणावं लागत आहे. राज्याचं उत्पन्न कमी आणि राज्यावर कर्ज जास्त झाले आहे. शेतकऱ्याला द्यायला पैसे नाहीत, पण बुलेट ट्रेनसाठी पैसे आहेत. राज्यातले उद्योग गुजरातला गेले. राज्यातील पाणी दुसऱ्या राज्यात देण्याचं काम सुरू झाले आहे. महाराष्ट्राच्या जनतेला कर्जामध्ये टाकण्याचं काम भाजप ठरवून करते आहे, असा आरोपही नाना पटोलेंनी यावेळी केला आहे.

बुलेट ट्रेनची गरज नाही. गुजरातसाठी स्पेशल काय आहे. राज्य सरकारने ७० टक्के खर्च केला. राज्याला लुटण्याचा काम भाजप करत आहे. राज्याला लुटून गुजरात सुरतला देत आहेत, असा घणाघातही त्यांनी केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com