उद्धव ठाकरेंनी आता घरात बसावे व काही बोलू नये, बोलले तर...; नारायण राणेंचा घणाघात

उद्धव ठाकरेंनी आता घरात बसावे व काही बोलू नये, बोलले तर...; नारायण राणेंचा घणाघात

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल देत शिंदे गटाला दिलासा दिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना नारायण राणे यांनी उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे दोघे आपले पदावर राहणारे हे निश्चित झाले आहे. सरकारच्या बाजूने निकाल लागला आहे. या निर्णयामुळे पोटशूळ फार बऱ्याच जणांना झाला आहे, असा निशाणा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उध्दव ठाकरेंवर साधला आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल देत शिंदे गटाला दिलासा दिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना नारायण राणे यांनी उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

उद्धव ठाकरेंनी आता घरात बसावे व काही बोलू नये, बोलले तर...; नारायण राणेंचा घणाघात
सत्तासंघर्षाच्या निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; कायदेशीर सरकारवर शिक्कामोर्तब

आजचा निकाल हा न्यायाचा व लोकशाहीचा विजय आहे. परंतु, कालपर्यंत विरोधकांकडून प्रतिक्रिया येत होत्या. १६ आमदार अपात्र ठरणार, शिंदे-फडणवीस सरकार जाणार, आमचे सरकार येणार बोलत होते. पण कसे येणार? आपल्याकडे १४५चे संख्याबळ आहे का? आजच्या सामनात पाहा. १६ आमदार अपात्र ठरणार भविष्यवाणी सांगत होते, असे नारायण राणे यांनी म्हंटले आहे.

उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली. नैतिकतेवर ते बोलत होते. नैतिकतेशी त्यांचा संबंध कधी आला नाही. शिवसेना व भाजप एकत्र लढले. व निकालात बहुमत मिळाले. पण, शिवसेना भाजपसोबत आली नाही. त्यांनी नितीमत्ता व हिंदुत्वाला सोडचिठ्ठी दिली. शरद पवार त्यांना मुख्यमंत्री करतील, असे त्यांना वाटले होते.

नैतिकता, नितीमत्ता यावर बोलण्याचा अधिकार त्यांना राहिला नाही. चिरफाड करेल ही उद्धव ठाकरेंची भाषा आहे. चांगल्या गोष्टी त्यांना बोलता येत नाहीत. ४० आमदार डोळ्यासमोर गेले. तेव्हा काही बोललं नाही. त्यांना थांबवण्याची हिंमत नव्हती. काल काय वाट पाहत होते. एकनाथ शिंदे खाली उतरवणार. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर बसवणार. काय गणपती आहे का बसवायला, असा जोरदार घणाघातही त्यांनी केला आहे.

तर, संजय राऊत मेरा नाम जोकरमधील जोकर आहे. आपल्या बोलल्याने शिवसेना संपली, याचे त्याला भान नाही. कलेक्टरचे काम करायचे आणि आपले पद टिकवायचे एवढेच त्यांना काम आहे. देशात लोकशाहीची हत्या होतेय. देशात सोडा, शिवसेना गल्लीतही राहिली नाही. उद्धव ठाकरेंचे क्षेत्र किती? मातोश्रीएवढे. त्यांनी आता घरात बसावे व काही बोलू नये. बोलले तर ऐकण्याची पण तयारी ठेवावी. उद्धव ठाकरेंमध्ये ताशेरे ओढण्यासाठी जोर आहे का? एक ना धड भाराभर चिंध्या. सर्व पक्ष एकत्र येणार का? एक तरी खासदार देशात निवडून आणून दाखवा, असे थेट आव्हानच नारायण राणेंनी उध्दव ठाकरेंना दिले आहे.

उद्धव ठाकरे यांना आमच्या नेत्यांवर बोलण्याचा अधिकार नाही. पात्रता नाही, गुणवत्ता म्हणणार नाही. जर बोलले तर आम्ही जे बोलू ते ऐकण्याची ताकद ठेवा. आता असलेले आमदार २०२४ पर्यंत राहणार का? ते पाहा. आता एक घर त्याला बंद झाले आहे. शरद पवारांनी ज्या प्रकारे त्यांना झोडलाय. ते पाहता घर का ना घाट का अशी अवस्था आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com