Jitendra Awhad
Jitendra AwhadTeam Lokshahi

जितेंद्र आव्हाड पिसाळलेले; नरेंद्र पाटलांचा घणाघात

जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच औरंगजेबाविषयी विधान केले. त्यामुळे ते पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच औरंगजेबाविषयी विधान केले. त्यामुळे ते पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. आव्हाडांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजपकडून जोरदार निषेध नोंदवला आत आहे. यावरुन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी जितेंद्र आव्हाडांवर घणाघात केला आहे.

Jitendra Awhad
'स्वत:ला बाजीप्रभू देशपांडे म्हणवून घेणारे खिंड सोडून पळाले'

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे पिसाळलेले आहेत. त्यांच्या मतदारसंघात भोंग्याचे आवाज वाढल्याने त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल घाणेरडे विचार व्यक्त करावे वाटतात, अशा शब्दात नरेंद्र पाटील यांनी आव्हाडांवर टीका केली. आव्हाडांच्या भूमिकेला शरद पवार आणि इतरांचे समर्थन आहे का? असा सवाल देखील पाटील यांनी उपस्थित केला.

दरम्यान, या वादावर भाष्य करताना जितेंद्र आव्हाड यांनी, मी जे बोललो त्याचे संदर्भासहित स्पष्टीकरण आहे. बहुजनांना बदनाम करण्याची जुनीच पद्धत आहे. जे सत्य आहे ते लोकान समोर मांडले, असे स्पष्टीकरण दिले होते.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com