Ajit Pawar
Ajit Pawar Team Lokshahi

मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवारांची टीका; म्हणाले, बऱ्याच जणांनी नवीन सूट...

शिंदे- फडणवीस सरकार केवळ घटनाबाह्य नाही तर स्थगिती सरकार आहे.

सहा महिन्यांपूर्वी शिवसेनेत बंडखोरी झाली. 40 आमदारांना घेऊन शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी ही बंडखोरी केली. वेगळे झालेल्या गटाने भाजपसोबत जाऊन राज्यात सत्ता स्थापन केली. परंतु, कुठल्या ना कुठल्या कारणावर या सरकारवर विरोधकांवर टीका होत आहे. त्यातच या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अनेक दिवसांपासून रखडला आहे. त्यामुळे याच मंत्रिमंडळावरून विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

Ajit Pawar
एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, 2019ला मुख्यमंत्रीपदासाठी माझे नाव...

काय म्हणाले नेमकं अजित पवार?

आज नेवासा येथे भाषणादरम्यान बोलताना अजित पवार म्हणाले की, नव्या सरकारने बऱ्याच जणांना मंत्रीपदाचे गाजर दाखवले. आधी आपल्यासोबत घेतले. मंत्रीपद मिळेल या आशेने 40 आमदारांपैकी बऱ्याच जणांनी नवीन सूट शिवून घेतले. आता त्यांची बायको विचारते या सूटची घडी कधी मोडणार? यांनी नवस केले, अभिषेक करत बसलेत. पण नवस फेडायला अजून मंत्रीपद काही मिळालेले नाही. मंत्रीपद मिळाल्यावर नवस फेडायला येईन असे म्हणाले होते. पण राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही आणि यांना मंत्रीपद मिळाले नाही. असा देखील टोमणा त्यांनी यावेळी लगावला.

पुढे ते म्हणाले की, शिंदे- फडणवीस सरकार केवळ घटनाबाह्य नाही तर स्थगिती सरकार आहे. आधीच्या सरकारने सुरू केलेल्या प्रत्येक प्रकल्पावर स्थगिती लावली जात आहे. आमदार निलेश लंके, आमदार प्राजक्त तनपुरे यांनी त्यांच्या मतदार संघात आणलेल्या प्रकल्पांवर स्थगिती लावली आहे. असा देखील आरोप त्यांनी यावेळी केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com