मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जेवणाचे बील कोटींच्या घरात, अजित पवार संतापले; म्हणाले, सोन्याचा अर्क...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जेवणाचे बील कोटींच्या घरात, अजित पवार संतापले; म्हणाले, सोन्याचा अर्क...

उद्यापासून राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. 4 मार्चपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात 9 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार आहे.

राज्यात सध्या एकीकडे राजकीय गदारोळ सुरु असताना आता उद्यापासून राज्याचे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. 4 मार्चपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात 9 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार आहे. मात्र, त्याआधी आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलावण्यात आलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला आहे. त्यासोबतच विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ राज्यपाल बैस यांची भेट घेणार आहे. अशी माहिती राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जेवणाचे बील कोटींच्या घरात, अजित पवार संतापले; म्हणाले, सोन्याचा अर्क...
'माझा जन्म औरंगाबादमध्ये झाला आणि मी औरंगाबादमध्येच मरणार' नामांतराला जलील यांचा कडाडून विरोध

काय म्हणाले अजित पवार?

उद्यापासून सुरु होणाऱ्या अधिवेशनाबाबत बोलताना अजित पवार यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, विकासकामांमध्ये राजकारण होत असल्याने विकासाच्या प्रक्रियेला फटका बसला आहे. अर्थसंकल्पात मागे मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे विकासकामे ठप्प पडली आहेत. हे सरकार तिथे लक्ष देण्यास कमी पडले आहे. जाहिरातबाजीवर वारेमाप खर्च केला जातो. आणि दुसरीकडे ग्रामीण भागाच्या विकासासाठी असलेल्या निधीचे वितरण झालेले नाही. आर्थिक वर्ष संपत आले. त्यामुळे हा निधी परत जणार आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे

पुढे ते म्हणाले की, विकासकामांऐवजी इतर बाकीच्या गोष्टींवर ही उधळपट्टी सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्यावरील जेवणाचे बील 2 कोटी 38 लाख रुपये आले. आमचे काही सहकारीदेखील मुख्यमंत्री होते. मी पण उपमुख्यमंत्री होतो. चार महिन्यात जेवणाचे बील 2 कोटी 38 लाख एवढं बील कसं काय? चहामध्ये सोन्याचे पाणी वगैरे घातले होते का? सरकार चहात सोन्याचा अर्क टाकते का? असा सवाल करत त्यांनी शिंदे फडणवीस सरकारला टोला लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com