Ajit Pawar
Ajit Pawar Team Lokshahi

आता हे कुणाचा बळी द्यायला चालले, अजित पवारांची शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावर खोचक टीका

“ठाकरे सरकार पाडण्यासाठी कामाख्या देवीला बोललेला नवस फेडण्यासाठी गुवाहाटीला चाललोय”- दीपक केसरकर
Published by :
Sagar Pradhan

राज्यात एकीकडे अभूतपूर्व राजकीय घडामोडी घडत आहे. अशातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप असताना सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा गुवाहाटी दौऱ्यावर कामाख्या मंदिरात दर्शनासाठी जाणार आहे. मात्र, या दौऱ्याआधी शिंदे गटावर विरोधक जोरदार टीका करत आहे. त्यावरच आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खोचक शब्दांत टीका केली आहे.

Ajit Pawar
त्याचे हाणूनी थोबाड फोडा, रामदेव बाबांच्या विधानावर मिटकरींची विखारी टीका

काय म्हणाले अजित पवार?

पुण्यामध्ये पार पडलेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांनी सरकारवर टीका केली. त्यावेळी ते म्हणाले की, “ते कामाख्या देवीच्या दर्शनाला चालले आहेत. काही ठिकाणी आपण बकरं कापतो, काही ठिकाणी कोंबडी कापतो. तसं तिथं रेडा कापला जातो म्हणतात. रेड्याचा बळी देतात. आता हे कुणाचा बळी द्यायला चालले आहेत ते माहिती नाही. पण जर दर्शनाच्या कामाला चालले असतील तर आपण एकमेकांना शुभेच्छाच देतो”, असं अजित पवार म्हणाले.

“ठाकरे सरकार पाडण्यासाठी कामाख्या देवीला बोललेला नवस फेडण्यासाठी गुवाहाटीला चाललोय”, असं दीपक केसरकर म्हणाल्याचं पत्रकारांनी सांगताच अजित पवारांनी त्यावर खोचक प्रतिक्रिया दिली. “शालेय शिक्षणासारखं महत्त्वाचं खातं सध्या त्यांच्याकडे आहेत. अलिकडच्या काळात त्यांचा एवढा अभ्यास वाढला आहे. त्यामुळे ते अभ्यासपूर्णच बोलले असतील. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचं स्वागतच आहे”, असं अजित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com