Eknath Shinde | Amol Mitkari
Eknath Shinde | Amol MitkariTeam Lokshahi

फडफडणारा दिवा रात्रभर जळत नसतो; मिटकरींचा शिंदे गटावर निशाणा

शिंदे गट अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी व्हीप जारी करणार असल्याची माहिती दिली आहे. यावरुन अमोल मिटकरी यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.

मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. यानंतर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी व्हीप जारी करणार असल्याची माहिती दिली आहे. यामुळे ठाकरे गटासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. यावरुन राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

Eknath Shinde | Amol Mitkari
शिंदे गट घेणार मोठा निर्णय; आदित्य ठाकरेंची आमदारकी धोक्यात?

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची आज महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये आमदारांना व्हीप बजावला जाणार आहे. सर्व 56 शिवसेना आमदारांना व्हीप बजावणार असून हा व्हीप उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सुद्धा लागू असणार आहे. तसेच, जर कुणी व्हीप पाळला नाहीतर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल, असा इशाराच भरत गोगावले यांनी दिला आहे.

यावर ठाकरेंच्या 16 आमदारांना व्हिप जारी करून आदेशाचं पालन करायला लावणाऱ्यांनो, अगोदर तुमचे 17 आमदार अपात्र होणार आहेत त्याची काळजी घ्या. फडफडणारा दिवा रात्रभर जळत नसतो. जनता तुम्हाला लवकरच धडा शिकवेल, अशी टीका मिटकरींनी शिंदे गटावर केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्यापासून सलग तीन दिवस सुनावणी होणार आहे. यादरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयासंदर्भात ठाकरे गटाचा आक्षेप आहे. याबाबतही युक्तिवाद या तीन दिवसांत केला जाऊ शकतो. परंतु, त्याआधीच ठाकरे गटातील आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार का? हे सुद्धा पाहण्याचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com