Amol Mitkari
Amol MitkariTeam Lokshahi

शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रांना शिंदे-फडणवीस सरकार घाबरलेलं- अमोल मिटकरी

आमदार रवी राणा यांनी कोथळा काढण्याची भाषा केली. त्यांच्यावर का नाही अमरावतीत जिल्हाबंदी केली
Published by :
Sagar Pradhan

राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डीमध्ये मंथन शिबिर पार पडत आहे. याच शिबिरा दरम्यान अनेक विधान देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून येत आहे. दरम्यान, पुढच्या वर्षी विठ्ठलाची महापूजा ही महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री करतील, असे खळबळजनक ट्वीट राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केले. पुढची महापूजा फडणवीस मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणून करू शकणार नाही, असा विश्वास अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला. सोबतच शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आणि शरद कोळी यांच्यावर महाप्रबोधन पार्श्वभूमीवर घातलेल्या जिल्हाबंदीवरून सुद्धा शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

Amol Mitkari
मतदारसंघातील नागरिकांसाठी भाजप आमदार कदम यांची अनोखी प्रतिज्ञा; पाणी मिळेपर्यंत केस कापणार नाही...

एका वृत्तवाहिनीला बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा राज्यातला प्रादेशिक पक्ष आहे. १०० आमदार निवडून आणू. कारण आम्ही भविष्याचा वेध घेत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यमंत्री आगामी काळात नेतृत्व करताना दिसतील, असा आशावाद मिटकरी यांनी बोलून दाखवले आहे. हे सरकार घटनाबाह्य आहे. नियमावली पाळत नाहीत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्याचं उल्लंघन कुणी करत असेल, तर ठीक आहे. गुलाबराव पाटील हे जास्त प्रक्षोभक बोलतात. त्या तुलनेत शरद कोळी हे तेवढे प्रक्षोभक बोलले नाहीत. तरीही त्यांच्यावर जिल्हाबंदी का आणली.

आमदार रवी राणा यांनी कोथळा काढण्याची भाषा केली. त्यांच्यावर का नाही केली अमरावतीत जिल्हाबंदी. तुम्ही घाबरलेले आहात. शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रांना शिंदे-फडणवीस सरकार घाबरलेलं आहे. जिल्हाबंदी करून कुणाचा आवाज दाबता येणार नाही. उलट जास्त उद्रेक होईल. जिल्हाबंदी वाढविल्यास जनतेचा रोष हा मतपेटीतून दिसेल.या यात्रेला गुलाबराव पाटील हे मनातून घाबरले आहेत, असा टोला अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com