Nitesh Rane : नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांना मारण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिली होती

Nitesh Rane : नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांना मारण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिली होती

नितेश राणे यांचे खळबळजनक ट्विट

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षात रोज नाट्यमय वळण मिळत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना सुरक्षा देण्यावरुन शिंदे गट आणि शिवसेना (Shivsena) आमने-सामने आले आहेत. यामध्ये आता भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उडी घेतली आहे. नारायण राणे (Narayan Rane) यांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा त्यांना मारण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सुपारी दिली होती, असा खळबळजनक आरोप नितेश राणे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केले आहे.

Nitesh Rane : नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांना मारण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिली होती
शिंदे-फडणवीस सरकार स्थापनेनंतर राज्यात प्रथमच ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा सरपंच

एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांच्या जीवाला धोका असतानाही झेड प्लस सिक्युरिटी नाकारल्याचा आरोप करत आमदार सुहास कांदे यांनी करत एकच खळबळ उडवली. त्यानंतर आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच जेव्हा माझ्या वडिलांनी शिवसेना सोडली तेव्हा शांत आणि शालिन दिसणाऱ्या पक्षप्रमुखांनी त्यांना मारण्यासाठी अनेकांना सुपारी दिली होती, असा आरोप राणेंनी केला आहे. तसेच, जरा ही म्याँव म्यांव संपूदे त्यानंतर आम्ही योग्य प्रकारे वस्त्रहरण करू. सगळ्या गोष्टींची सव्याज परतफेड केली जाईल या आशयाचं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.

Nitesh Rane : नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांना मारण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिली होती
गृहमंत्री पद दिल्यास सत्तेत सहभागी होऊ; अमित ठाकरेंचं मोठ विधान

दरम्यान, एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री होते. नक्षलवाद्यांकडून एकनाथ शिंदे यांचा खून करण्याचा प्रयत्न होता. ही बातमी सुरक्षा यंत्रणा समजल्यावर त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी झाली. मात्र, वर्षा बंगल्यावरुन (थेट उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता) त्यांना झेड प्लस सुरक्षा देऊ नये, असे आदेश आले. म्हणजे शिंदे त्यांचा खून करण्याचा हा प्रयत्न होता, असा थेट आरोप सुहास कांदे यांनी केला. परंतु, तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हे आरोप फेटाळले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून एकनाथ शिंदेंना सुरक्षा देऊ नका अशा कोणत्याही सुचना नव्हत्या. पत्र दिल्यानंतर जेवढी सुरक्षा तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना होती तेवढीच एकनाथ शिंदेंना होती, असा खुलासा वळसे पाटील यांनी दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com