या भेटीत देशविरोधी षडयंत्र रचलं होतं का? नितेश राणेंची राऊत-मलिक भेटीवर टीकास्त्र

या भेटीत देशविरोधी षडयंत्र रचलं होतं का? नितेश राणेंची राऊत-मलिक भेटीवर टीकास्त्र

संजय राऊत यांनी सत्यपाल मलिक यांची भेट घेतली आहे. या भेटीवर भाजप नेते नितेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे.

सिंधुदुर्ग : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेतली आहे. या भेटीवर भाजप नेते नितेश राणे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. केंद्र सरकारने या दोघांच्या भेटीवर फार बारकाईने लक्ष घालावं. कारण या दोघांची भाषा पाकिस्तानची भाषा एकच आहे. म्हणून या दोघांमध्ये नेमकं देशविरोधी षडयंत्र रचलं होतं का? असा आरोप त्यांनी केला आहे.

या भेटीत देशविरोधी षडयंत्र रचलं होतं का? नितेश राणेंची राऊत-मलिक भेटीवर टीकास्त्र
भाकरी फिरवायची वेळ आलीय; शरद पवारांच्या विधानाचा अजित पवारांनी सांगितला नेमका अर्थ

मुंबईमध्ये सुद्धा भारताविरुद्ध काही अतिरेकी कारवाया झाल्या तर त्याला या भेटीचा संदर्भ देण्यात यावं आणि केंद्र सरकारने या दोघांच्या भेटीवर फार बारकाईने लक्ष घालावं कारण या दोघांची भाषापाकिस्तानची भाषा एकच आहे. म्हणून या दोघांच्या भेटण्याचं काय उद्दिष्ट होतं? याच्यामध्ये नेमकं देशविरोधी काय षडयंत्र रचलं होतं का आणि देशाविरुद्ध कुठल्या कारवाया शिजत होत्या का? या सगळ्या बाबतीमध्ये मलिक आणि संजय यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.

संजय राऊतांनी ते पार्सल मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आणण्यापेक्षा मलिकांसकट पाकिस्तानमध्ये निघून जावं. तिथे बसून शिरखुर्मापासून बिर्याणी बसून खावी. अशा देशद्रोही लोकांची आमच्या भारताला काही गरज नाही आणि आमच्या मुंबई महाराष्ट्रामध्ये मलिकांसारख्या देशद्रोहीला आम्ही पाऊलही ठेवून देणार नाही, अशी जोरदार टीकाही त्यांनी केली आहे.

दरम्यान, विरोध करायचे आणि एअरपोर्ट उद्घाटनासाठी कोण आलंय तिकडे म्हणजे पहिला विरोध करायचं आणि घरात मिठाई पाठवल्यानंतर प्रकल्पाचा उद्घाटन करायला सर्वात पुढे यायचं बसायचं हे उद्धव ठाकरेंनी करू नये. त्याचे वक्तव्य म्हणजे कंपनीच्या लोकांनी त्याला लवकर येऊन भेटावं फक्त संदेश देतोय, असा टोला नितेश राणेंनी बारसू रिफायनरीवरुन लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com