Nitin Deshmukh
Nitin DeshmukhTeam Lokshahi

सर्व जिल्हाधिकारी, तहसीलदारांना माझ्या चौकशीचे आदेश द्या; देशमुखांचा शिंदेंना टोला

आमदार नितीन देशमुख बेहिशोबी मालमत्ता प्रकरण; अमरावती एसीबीचे पातूर तहसीलदाराला पत्र

सुरज दहाट | अमरावती : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना बेहिशोबी मातमत्तेप्रकरणी एसीबीने नोटीस पाठवली आहे. याप्रकरणी त्यांची चौकशीही करण्यात आली होती. आता देशमुखांच्या मालमत्तांच्या खरेदी-विक्रीचा शोध घेत त्याची कागदपत्रे अमरावतीला सादर करण्यासंदर्भात अमरावती एसीबीनं अकोला जिल्ह्यातील पातूरच्या तहसीलदारांना पत्र लिहिले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील नितीन देशमुखांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

Nitin Deshmukh
पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज 'परीक्षा पे चर्चा'

अकोला जिल्ह्यातील बाळापुरचे आमदार नितीन देशमुख यांच्यावर बेहिशेबी मालमत्तांच्या आरोपानंतर अमरावती एसीबीनं त्यांची चौकशी सुरू केली. त्यांना 17 जानेवारीला चौकशीसाठी अमरावतीच्या विभागीय कार्यालयात बोलविण्यात आलं होतं. आता देशमुखांच्या मालमत्तांच्या खरेदी-विक्रीचा शोध घेत त्याची कागदपत्रे अमरावतीला सादर करण्यासंदर्भात अमरावती एसीबीनं अकोला जिल्ह्यातील पातूरच्या तहसीलदारांना पत्र लिहिलं. आमदार देशमुखांचं मुळगाव सस्ती हे पातूर तालुक्यात आहे. अमरावतीच्या विभागीय कार्यालयानं पातूरच्या तहसीलदारांना संपत्तीच्या व्यवहारांच्या खरेदी-विक्रीची माहिती मागितली आहे. देशमुख यांचे भाऊ, बहिण, आई, पत्नी, मुलगा, मुलगी यांच्या नावाने संपत्ती घेतली असल्यास शोधण्याचे आदेश पातूर तहसीलदारांना देण्यात आले आहेत.

दरम्यान, आमदार देशमुख यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना आपल्या चौकशीचे तपास करण्याचे आदेश द्या, असा टोला शिंदे सरकारला लगावला. तर, याआधी देशमुख यांनी थेट सोबत कपड्यांची बॅग घेऊन एसीबीसमोर हजर झाले. एसीबीसमोर हजर झाल्यानंतर आपल्याला अटक करतील व आत टाकतील. त्या हिशोबाने तयारीला केली असल्याची प्रतिक्रिया नितीन देशमुख यांनी दिली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com