Rohit Patil | Nitin Gadkari
Rohit Patil | Nitin GadkariTeam Lokshahi

रोहित आर.आर. पाटील कामाचा माणूस; शरद पवारांसमोर गडकरींची स्तुतीसुमने

माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांचे सर्वपक्षीय आणि सर्वक्षेत्रीय व्यक्तींशी मैत्रीपूर्ण व सलोख्याचे संबंध होते.

संजय देसाई | सांगली : माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांचे सर्वपक्षीय आणि सर्वक्षेत्रीय व्यक्तींशी मैत्रीपूर्ण व सलोख्याचे संबंध होते. त्यांचा मुलगा रोहित पाटील यांच्या बाबतीतही हीच प्रचिती येत आहे. रोहित पाटील जनहिताच्या वेगवेगळ्या कामासाठी मला भेटत असतो. मी रोहितला व्यक्तिश: चांगले ओळखतो आणि तो खरोखरच कामाचा माणूस आहे, अशी स्तुती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी थेटपणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष पद्मविभूषण शरद पवार यांच्या समोरच केली.

Rohit Patil | Nitin Gadkari
लव्ह जिहादच्या नावाखाली समाजात विष पेरण्याच काम सुरू : अजित पवार

भिलवडी येथे चितळे उद्योग समूहाने उभारलेल्या अशिया खंडातील सर्वात मोठ्या अशा सक्सेल सिमेन प्रयोगशाळेच्या उद्घाटनास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पालकमंत्री सुरेश खाडे, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार संजय पाटील, आमदार अरुण लाड, आमदार विश्वजीत कदम उपस्थित होते.

हे सर्व नेते इलेक्ट्रीक गोल्फ कार्टमधून उद्योग समूहाच्या आवारात फेरफटका मारत होते. या गोल्फ कार्टमध्ये पुढे पालकमंत्री सुरेश खाडे बसले होते. दुसऱ्या बाकावर पद्मविभूषण शरद पवार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे दोघे बसलेले होते. तर शेवटच्या बाकावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बसलेले होते.

नेमक्या याच वेळी आमदार सुमन पाटील आणि रोहित पाटील तेथे आले. दोघांनाही पाहून शरद पवार यांनी त्या इलेक्ट्रीक गोल्फ कार्टच्या चालकास गाडी थांबवायला सांगितली. आमदार सुमन आणि रोहित यांना पुढे बोलावून घेऊन ते नितिन गडकरींना म्हणाले की, हा रोहित पाटील आहे.

यावर गडकरी म्हणाले की, रोहित पाटील जनहिताच्या कामासाठी माझ्याकडे येत असतो. तासगावातील रिंगरोडचे काम मार्गी लावण्यासाठीही मला भेटलेला आहे. लोकांच्या विविध प्रश्न सोडविण्यासाठी तो सतत धडपडत असतो. या गोष्टी माझ्या कानावर आल्या आहेत. रोहित खरोखरच कामाचा माणूस आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com