दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग! राहुल गांधींच्या घराबाहेर पोलीस दाखल

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग! राहुल गांधींच्या घराबाहेर पोलीस दाखल

राहुल गांधींच्या घराबाहेर पोलिस पोहोचले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

नवी दिल्ली : दिल्लीत आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या विधानावरुन सत्ताधाऱ्यांनी त्यांना माफी मागणी लावून धरली आहे. अशातच, राहुल गांधींच्या घराबाहेर पोलिस पोहोचले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, राहुल गांधींनी वेळ मागितला असल्याने पोलिसांनी त्यांना दुसरी नोटीस दिली आणि परतले आहेत. यापूर्वी 16 मार्च रोजी पोलिसांनी राहुलला नोटीस पाठवली होती.

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग! राहुल गांधींच्या घराबाहेर पोलीस दाखल
'बाप-बेटे अफजल खानाप्रमाणे चालून आले होते'

पोलिसांनी सांगितले की, आम्ही येथे राहुल गांधींशी बोलण्यासाठी आलो आहोत. राहुल गांधी यांनी भारत जोडोदरम्यान 30 जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये विधान केले होते की, भेटीदरम्यान ते अनेक महिलांना भेटले आणि त्यांनी त्यांच्यावर बलात्कार झाल्याचे सांगितले. त्याबाबतची माहिती गोळा करण्यासाठी आम्ही आलो आहेत. जेणेकरून पीडितांना न्याय मिळू शकेल. पोलिसांनी 15 मार्चला या प्रकरणाची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. पण अपयश मिळाले आणि 16 मार्चला त्यांना नोटीस पाठवली होती.

दिल्लीतील त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला. मात्र, अशी कोणतीही महिला सापडली नाही. आम्ही आधीही जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. पण, राहुल परदेशात असल्याने भेटू शकलो नाही. पोलिसांनी लवकरात लवकर ही माहिती घ्यावी, जेणेकरून पीडितेला कोणतीही अडचण येऊ नये, ही माहिती घेण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत, असे पोलिसांनी सांगितले आहे.

स्पेशल सीपी सागर प्रीत हुड्डा यांच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधी म्हणाले की, अनेक महिलांनी विधाने दिली आहेत, पण ती संकलित करण्यासाठी वेळ लागेल. त्यामुळे आजही राहुल गांधी यांचे म्हणणे नोंदवून घेतले नाही. पोलिस लवकरात लवकर त्याचा जबाब नोंदवण्याचा प्रयत्न करतील.

दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईवर कॉंग्रेसने टीका केली आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हणाले की, भारत जोडो यात्रा संपून ४५ दिवस झाले आहेत. दिल्ली पोलीस ४५ दिवसांनी चौकशीसाठी जात आहेत. जर त्यांना इतकी चिंता असेल तर ते फेब्रुवारीत का गेले नाहीत, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com