Eknath Shinde | Rajan Vichare
Eknath Shinde | Rajan VichareTeam Lokshahi

आनंद आश्रमाला बाळासाहेबांची शिवसेना नाव देऊन फरक पडत नाही, तर...; विचारेंचा टोला

धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी शक्तिस्थळावर जाऊन फुलं अर्पण करत अभिवादन केलं

ठाणे : धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी शक्तिस्थळावर जाऊन फुलं अर्पण करत अभिवादन केलं आहे. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शक्तिप्रदर्शन केलं. दरम्यान आनंद आश्रमाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देऊन काही फरक पडत नाही त्यात संस्कार असावे लागतात, असा टोला राजन विचारेंनी शिंदे गटाला लगावला आहे.

Eknath Shinde | Rajan Vichare
महाराष्ट्राला गद्दारी आवडत नाही सुप्रिया सुळेंचा शिंदे - फडणवीस सरकारवर निशाणा

शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांची आज ७१ वी जयंती आहे. यानिमित्त अभिवादन करण्याकरिता राजन विचारे शक्तीस्थळावर दाखल होते. धर्मवीर आनंद दिघे यांचे शिष्य राजन विचारे यांनी आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त शक्तीस्थळावर फुले अर्पण अभिवादन करून केले. यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन आनंद दिघे यांच्या शक्ती स्थळावर करण्यात आले आहे. अनेक महिलांनी घोषणाबाजी केली आहे. आनंद आश्रमाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव देऊन काही फरक पडत नाही त्यात संस्कार असावे लागतात असा टोला देखील यावेळी राजन विचारे यांनी शिंदे गटाला लगावला आहे.

दरम्यान, राज्यात सत्तानंतर झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात दाखल झाले होते. उद्धव ठाकरे हे टेंभी नाका येथील शिवसेनेचे दिवंगत नेते स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. परंतु, यादरम्यान उध्दव ठाकरे यांनी आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात जाण्याचे टाळले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. उध्दव ठाकरेंच्या दौऱ्याआधीच आनंद आश्रम येथे बाळासाहेबांची शिवसेना हा फलक लावण्यात आला होता. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी आनंद आश्रम येथे जाण्याचे टाळले असल्याची चर्चा होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com