Uday Samant | Raju Shetti
Uday Samant | Raju ShettiTeam Lokshahi

50 खोके घेणाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनावर टीका करू नये; राजू शेट्टींचा सामंतांना टोला

विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगलीसह अनेक मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.

सांगली : विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगलीसह अनेक मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनावर शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी सरकारला बदनाम करण्यासाठी अशी आंदोलनही करावी लागतात, असा टोला लगावला होता. यावर राजू शेट्टी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 50 खोके घेणाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनावर टीका करू नये, अशा शब्दात शेट्टींनी सामंतांवर पलटवार केला.

Uday Samant | Raju Shetti
संजय राऊतांकडे आम्ही मनोरंजन म्हणून पाहतो; उदय सामंतांची खोचक टीका

काय म्हणाले होते उदय सामंत?

 शिंदे यांच्याकडे येण्यासाठी मोठ-मोठ्या नेत्यांचा ओघ वाढला आहे. आपण त्यात नाही हे दाखवण्यासाठी आणि सरकारला बदनाम करण्यासाठी अशी आंदोलनही करावी लागत आहेत, असा टोला उदय सामंत यांनी राजू शेट्टी यांना लगावला आहे.

राजू शेट्टींचा पलटवार

50 खोके घेणाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनावर टीका करू नये. नेमकी स्टंटबाजी कोण करते हे पुढील काळात कळेल, असा टोला मंत्री उदय सामंत यांना राजू शेट्टी यांनी लगावला.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज राज्यभर चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आलेला आहे. आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर नजीकच्या अंकली फाट्या जवळ राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. आंदोलकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com