एकनाथ शिंदे रडले, म्हणून उध्दव ठाकरे पडले; आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर आठवलेंचा टोला

एकनाथ शिंदे रडले, म्हणून उध्दव ठाकरे पडले; आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर आठवलेंचा टोला

आदित्य ठाकरे यांच्या गौप्यस्फोटामुळे आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली असून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

पुणे : जेलच्या भीतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपबरोबर गेले, असा मोठा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली असून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. या विधानावरुन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरेंचा आरोप अत्यंत चुकीचा आहे, असे त्यांनी म्हंटले आहे. तसेच, एकनाथ शिंदे रडले म्हणून उध्दव ठाकरे पडले, असा मिश्कील टोलाही आठवलेंनी लगावला आहे.

एकनाथ शिंदे रडले, म्हणून उध्दव ठाकरे पडले; आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर आठवलेंचा टोला
Asad Ahmed Encounter : गँगस्टर आतिक अहमदचा मुलगा असदचा एन्काऊंटर

एकनाथ शिंदे मजबूत माणूस आहेत. ते रडणार नाहीत. आदित्य ठाकरेंचा आरोप अत्यंत चुकीचा आहे. आम्हाला स्वप्नात पण वाटल नव्हत एवढे आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत जातील. उध्दव ठाकरेंना कंटाळून ते गेले, अशी टीकाही रामदास आठवले यांनी केली आहे.

अजित पवार भाजपसोबत जाणार या अंजली दमानियांच्या दाव्यावर रामदास आठवले म्हणाले की, अजित पवार हे शरद पवारांचे पुतणे असून पवारसाहेबांनी त्यांना अनेक पद दिली आहेत. ते आजारी असल्याने नॉट रिचेबल होते. मला वाटत नाही ते भाजपात जातील. ते देवेंद्र फडणवीस यांचे चांगले मित्र त्यांनी एकदा पहाटे शपथ पण घेतली होती, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, आदित्य ठाकरेंनी एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत गौप्यस्फोट केला. एकनाथ शिंदे यांनी तुरुंगाच्या भीतीने बंड केलं आहे. एकनाथ शिंदे त्यावेळी मातोश्रीवर येऊन रडले होते. केंद्रीय यंत्रणांकडून अटक होणार होती, म्हणून सध्याचे मुख्यमंत्री आमच्या घरी येऊन रडले होते. जर भाजपसोबत गेलो नाही तर ते मला अटक करतील, असे एकनाथ शिंदे यांनी म्हंटल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com