शरद पवारांना बाप म्हणताय तर त्यांच्याकडून काहीतरी शिका; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

शरद पवारांना बाप म्हणताय तर त्यांच्याकडून काहीतरी शिका; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

महाविकास आघाडीच्या सभेवरुन उद्धव ठाकरेंचा रामदास कदम यांनी समाचार घेतला.
Published on

निसार शेख | रत्नागिरी : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे हे केवळ दोन वेळाच विधानसभेत गेले ही माहिती शरद पवार यांनी माध्यमांवर सांगितली आहे. त्यामुळे ज्यांना बाप म्हणताय त्यांच्याकडून काही तरी शिका, असा सल्ला शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभा म्हणजे फक्त गद्दार गद्दार म्हणण्यासाठी ओरड असून या थयथयाटाला जनता भीक घालणार नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

शरद पवारांना बाप म्हणताय तर त्यांच्याकडून काहीतरी शिका; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया; हे अनपेक्षित नव्हतं

महाविकास आघाडीच्या सभेत शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करतानाच आपल्या बारसू रिफायनरी दौऱ्याची घोषणा केलेल्या उद्धव ठाकरेंचा रामदास कदम यांनी समाचार घेतला. बारसुला रिफायनरी व्हावी यासाठी उद्धव ठाकरे यांनीच प्रस्ताव पाठवला आणि आता बारसुला जाऊन लोकांना भडकवायचं काम देखील उद्धव ठाकरे करणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे हे दुतोंडी गांडूळ किंवा दुतोंडी साप आहेत, अशी टीका रामदास कदम यांनी केली. उद्धव ठाकरे यांचा हा दुतोंडी पणा सर्वांना माहीत आहे त्यामुळे बारसू येथे गेल्यावर उद्धव ठाकरे यांच्या तोंडावर लोक थुंकतील, अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे.

तर, उद्धव ठाकरे यांचा मुलगा व बाळासाहेब ठाकरे यांचा नातू एवढीच आदित्य ठाकरे यांची ओळख असून त्यापलीकडे त्यांची कोणतीच ओळख नाही. त्यामुळे आदित्य ठाकरे यांची टीका करण्याची औकात नाही, अशीही जहरी टीका रामदास कदम यांनी केली आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या टीकेलाही रामदास कदम यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद गेले तर अजित पवार यांचे उपमुख्यमंत्री पद व अर्थ खाते गेल्याने सध्या त्यांचा थयथयाट सुरू आहे. निवडणुका घ्यायला आम्ही केव्हाही तयार आहोत पण ज्यावेळी तुम्ही सत्तेत होता त्यावेळी निवडणुका का घेतल्या नाहीत असा सवाल करत दुसऱ्याकडे एक बोट केले तर चार बोटे आपल्याकडे दाखवत असतात याचे भान अजित पवार यांनी ठेवावे, असा टोला रामदास कदम यांनी लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com