रश्मी ठाकरे राजकारणात होणार सक्रिय? मविआच्या महामोर्चात पहिल्यांदाच सहभागी

रश्मी ठाकरे राजकारणात होणार सक्रिय? मविआच्या महामोर्चात पहिल्यांदाच सहभागी

रश्मी ठाकरे मोर्चात सहभागी झाल्या आहेत. यावरुन राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

मुंबई : महापुरुषांचा अपमान, मंत्र्यांची बेताल विधानांविरोधात महाविकास आघाडीने महामोर्चाची हाक दिली आहे. आज 12 वाजता रिचर्डसन अँड कृडास, नागपाडा, मुंबई येथून या मोर्चाला सुरवात झाली आहे. या मोर्चात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, कॉंग्रेस नाना पटोले, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्वच बडे नेते सहभागी झाले आहेत. परंतु, यात पहिल्यांदाच उध्दव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे मोर्चात सहभागी झाल्या आहेत. यावरुन राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

रश्मी ठाकरे राजकारणात होणार सक्रिय? मविआच्या महामोर्चात पहिल्यांदाच सहभागी
महाविकास आघाडीच्या महामोर्चाला विराट गर्दी, बडे नेते सहभागी

महाविकास आघाडीच्या महामोर्चास सुरुवात झाली आहे. या मोर्चाला विराट गर्दी जमली असून संपूर्ण रस्ताच भगवामय झाला आहे. यामध्ये मोठे नेते सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे उध्दव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे मोर्चात सहभागी झाल्या आहेत. आजपर्यंत शिवसेनेचे अनेक मोर्चे, सभा झाल्या. परंतु, यामध्ये रश्मी ठाकरे कधीच सहभागी झाल्या नव्हत्या. आज पहिल्यांदाच रश्मी ठाकरे मोर्चात सहभागी झाल्या आहेत. अनेक वेळा पडद्यामागून सक्रिय असणाऱ्या रश्मी ठाकरे मोर्चात दिसल्याने त्या राजकारणात एंट्री करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

रश्मी ठाकरे राजकारणात होणार सक्रिय? मविआच्या महामोर्चात पहिल्यांदाच सहभागी
अशोक चव्हाण कॉंग्रेसवर नाराज? महामोर्चाला दांडी; चर्चांना उधाण

दरम्यान, नुकत्याच एका कार्यक्रमात उध्दव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्र्यांसंदर्भात संकेत दिले होते. यातही रश्मी ठाकरे यांच्या नावाची चर्चा झाली होती. रश्मी ठाकरे यांचे नाव अधूनमधून चर्चेत असते. त्या सक्रिय राजकारणात नसल्या तरी राजकारणावर त्यांचा प्रभाव असल्याचे म्हटले जाते. उद्धव ठाकरे आजारी असताना रश्मी ठाकरेंची चर्चा होती. आता त्या राजकारणात सक्रिय होणार, अशा शक्याता व्यक्त केल्या जात आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com