'आलोय बाहेर, आता बघू' जेलबाहेर येताच राऊतांची स्फोटक प्रतिक्रिया

'आलोय बाहेर, आता बघू' जेलबाहेर येताच राऊतांची स्फोटक प्रतिक्रिया

तब्बल 100 दिवसांनी संजय राऊतांना जामीन मंजूर करण्यात आला,त्यामुळे आज राज्यभर ठाकरे गटात आनंदाचे वातावरण आहे

मागील अनेक महिन्यांपासून कोठडीत असणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे. तब्बल 100 दिवसांनी संजय राऊतांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आज राज्यभर ठाकरे गटात आनंदाचे वातावरण आहे. संजय राऊत यांना पाहण्यासाठी आर्थर रोड कारागृहाबाहेर कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. जेलमधून बाहेर येताच संजय राऊत यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

'आलोय बाहेर, आता बघू' जेलबाहेर येताच राऊतांची स्फोटक प्रतिक्रिया
Video: संजय राऊत 102 दिवसानंतर कारागृहाबाहेर, कार्यकर्त्यांनी केला जबरदस्त जल्लोष

आलोय बाहेर, आता बघू, आम्ही लढणारे आहोत - संजय राऊत

आज पीएमएल कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर संजय राऊत हे जेलबाहेर त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, “एक आनंद आहे. न्यायालयावरचा विश्वास वाढला. न्यायालयाचं जे निरीक्षण आहे ते आम्ही सांगत होतो”, असे ते यावेळी म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, “माझी तब्येत जरा बरी नाही. मी नक्की माध्यमांशी बोलेन. पण मला बरं वाटलं की बोलेन”, असं संजय राऊतांनी सांगितलं. तसेच आपल्या कार्यकर्त्यांनी काय कार्यक्रम ठरवालय ते पाहून तिथे जाऊ, अशी माहिती त्यांनी यावेळी माध्यमांना दिली.

यावेळी काही पत्रकारांनी राऊतांना त्यांच्या ‘झुकेगा नहीं’ या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारला. त्यावर संजय राऊतांनी ‘त्यासाठीच शंभर दिवस जेलमध्ये राहिलो. लढाई सुरु राहील’ आलोय बाहेर, आता बघू, आम्ही लढणारे आहोत अशी पहिली प्रतिक्रिया राऊत यांनी यावेळी दिली आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com