लायकीत रहा, दम असेल तर...; शिवसेनेचा रवी राणांना आव्हान

लायकीत रहा, दम असेल तर...; शिवसेनेचा रवी राणांना आव्हान

शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू आणि भाजप समर्थक आमदार रवी राणा यांच्यामधील वाद संपूर्ण महाराष्ट्राने बघितला. हा वाद शांत होत असतानाच शिवसेनेच्या संपर्कप्रमुखांनी आता रवी राणा यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

सूरज दहाट | अमरावती : शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू आणि भाजप समर्थक आमदार रवी राणा यांच्यामधील वाद संपूर्ण महाराष्ट्राने बघितला. अनेक टीका, गंभीर आरोपानंतर आता रवी राणा आणि बच्चू कडू यांनी वाद संपल्याचे जाहीर केले आहे. हा वाद शांत होत असतानाच शिवसेनेच्या संपर्कप्रमुखांनी आता रवी राणा यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. शिवसेना (ठाकरे गट) संपर्कप्रमुख सुधीर सुर्यवंशी लायकीत रहा व जास्त दम असेल पोलीस बंदोबस्त बाजूला ठेवा आणि समोर या, असे आव्हान रवी राणांना दिले आहे.

लायकीत रहा, दम असेल तर...; शिवसेनेचा रवी राणांना आव्हान
संतोष बांगरांची मंत्रालयाच्या गेटवर पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ? म्हणाले...

बच्चू कडूंसोबतच्या वादात रवी राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. यावर सुधीर सूर्यवंशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रवी राणा तुम्ही उद्धव ठाकरेंची बरोबरी करू शकत नाही. लायकीत रहा. शिवसैनिक जागा झाला तर तुम्हाला पळता भुई होईल. त्यामुळे तुम्ही औकातीत रहा व नाहीतर पोलीस बंदोबस्त बाजूला ठेवून समोर या. नंतर जर उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली तर वाईट परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी रवी राणा यांना दिला आहे. यावर आता रवी राणा काय उत्तर देणार, याकडे सर्वांचेच लक्ष आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

लायकीत रहा, दम असेल तर...; शिवसेनेचा रवी राणांना आव्हान
सायरस मिस्त्री अपघाताचे खरे कारण आले समोर; चालकाच्या पतीचा मोठा जबाब

दरम्यान, बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांनी अनेक टीका, गंभीर आरोप एकमेकांवर केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीमुळे हा वाद थंडावला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा रवी राणा यांनी रवी राणाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा दम खालला नाही. बच्चू कडू तर काहीच नाही. घरात घुसून मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे हा वाद पुन्हा उफाळला होता. परंतु, अखेर काल हा वाद शमला असल्याचे बच्चू कडूंनी जाहीर केले.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com