शरद पवार यांचे उद्धव ठाकरेंनी पाय पकडले : रवी राणा

शरद पवार यांचे उद्धव ठाकरेंनी पाय पकडले : रवी राणा

रवी राणांचे उध्दव ठाकरेंवर शरसंधान

सूरज दहाट | अमरावती : ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट नुकतीच घेतली होती. यामुळे राजकीय वर्तुळातून तर्क-वितर्कांना उधाणा आले होते. यावर अपक्ष आमदार रवी राणा यांनी शरद पवार-उध्दव ठाकरेंच्या भेटीत काय घडले ते सांगितले आहे. शरद पवार यांचे उद्धव ठाकरेंनी पाय पकडले, अशी खोचक टीका रवी राणा यांनी केली आहे.

शरद पवार यांचे उद्धव ठाकरेंनी पाय पकडले : रवी राणा
मला लहान म्हणतायंत, मग मी मोठा झालो तर...; शिंदेंवर आदित्य ठाकरेंचा पलटवार

उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी शरद पवार यांच्याकडे जाऊन त्यांचे पाय पकडले. आम्हाला सोडून जाऊ नका तर आदित्य ठाकरे बालिश वक्तव्य करतात. तसेच एकनाथ शिंदे यांना डावलून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरे हा स्वार्थी माणूस आहे. उद्धव ठाकरे शरद पवार यांची भेट ही आम्हाला संकटातून सोडून जाऊ नका यासाठी झाली, अशी टीका रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

दरम्यान, उध्दव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट त्यांचे निवासस्थान सिल्व्हर ओक येथे घेतली. तब्बल सव्वा तास या दोघांमध्ये चर्चा झाली असून अद्याप गुलदस्त्यात असली तरी मविआतील मतभेदांच्या पार्श्वभूमीवर दोघांची भेट महत्वपूर्ण मानण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com