रोहित पवारांनी अजित पवारांना केली 'ही' विनंती म्हणाले...

रोहित पवारांनी अजित पवारांना केली 'ही' विनंती म्हणाले...

कर्जत जमखेडचे आमदार रोहित पवार यांनी MIDCच्या मुद्द्यावरून विधानभवन परिसरात आंदोलन केले.
Published by  :
Siddhi Naringrekar

कर्जत जमखेडचे आमदार रोहित पवार यांनी MIDCच्या मुद्द्यावरून विधानभवन परिसरात आंदोलन केले. विधानभवन परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ते आंदोलनासाठी बसले 

याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, लोक प्रतिनिधींनी निवेदन दिल्यानंतर एमआयडीसीचे चेरअमन आणि मंत्री महोदयांनी पत्र दिल्यानंतर याची गांभीर्याने नोंद घ्यायला हवी. अशा पद्धतीने आंदोलन करणे उचित नाही. अधिवेशनाला एकाच आठवडा झाला आहे. मंत्री महोदयांनी पत्र दिलं आहे. अधिवेशन संपलेलं नाही.

त्यानंतर रोहीत पवार यांनी ट्विट करत अजित पवारांना विनंती केली आहे. रोहीत पवार म्हणाले की, अजितदादा धडाडीने निर्णय घेणारे नेते म्हणून आपली ओळख आहे. #MIDC चा विषय हा आजचा नाही तर केवळ अधिसूचना काढून पुढील कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून मी वारंवार मुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांना भेटून विनंती केली, निवेदनं दिली, विधानसभेतही आवाज उठवला. परंतु राजकीय दबावाला बळी पडत सरकारने प्रत्येक वेळी माझी आश्वासनावर बोळवण केली. त्यामुळं नाईलाजाने उपोषणाला बसण्याचा निर्णय घ्यावा लागला. माझी आपणास विनंती आहे की, उपमुख्यमंत्री म्हणून आपणच याकामी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावला तर माझा संपूर्ण मतदारसंघ आपला कायमस्वरूपी आभारी राहील! असे रोहीत पवार यांनी ट्विट करत विनंती केली आहे.

रोहित पवारांनी अजित पवारांना केली 'ही' विनंती म्हणाले...
Pawar Vs Pawar : रोहित पवारांच्या आंदोलनावर अजित पवार म्हणाले...

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com