राजकारण
...आणि जाहिरातीत मिरवायचं मात्र दोघांनी; रोहित पवारांची टीका
अजित पवार यांच्या बंडानंतर राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला.
सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या मुद्यांवरून जुंपलेली असताना आता त्यात निधी वाटपावरून आणखी भर पडली आहे. याच पार्श्वभूमीवर आता रोहीत पवारांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. रोहीत पवारांचे हे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे.
या व्हिडीओत रस्त्याच्या कडेला एक बॅनर लावण्यात आलेले आहे. यात जाहिरातीचा डिजीटल बोर्ड दिसत आहे. या जाहीरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेच दिसत आहेत. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार या जाहीरातीमध्ये दिसत नाही आहेत. यावरुन रोहीत पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, काल रात्री काढलेला हा व्हिडिओ! सरकार चालवायचं तिघांनी, जाहिरातीत मिरवायचं मात्र दोघांनी! असे म्हणत टोला लगावला आहे.