Rohit Pawar : पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत रोहित पवार म्हणाले...

Rohit Pawar : पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत रोहित पवार म्हणाले...

राष्ट्रवादी शरद पवार गटाला सर्वात मोठा धक्का बसला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राष्ट्रवादी शरद पवार गटाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचं घड्याळ पक्ष, चिन्ह अजित पवार गटाला मिळालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा की शरद पवारांचा यावर निवडणूक आयोगामध्ये सुनावणी झाली.

केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाबाबत अजित पवार गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. राष्ट्रवादीचं घड्याळ पक्ष, चिन्ह अजित पवार गटाला मिळालं आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

यावर आता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, इलेक्शन कमिशनच्या प्रमुखाच्या नियुक्तीचा अधिकार पूर्णपणे सत्तेतील लोकांचा आहे.त्यामुळे कालच्या निकालावर काय बोलणार असंविधानिक पद्धतीने फुटीर गटाला पार्टी आणि चिन्ह जरी दिलं असल तरी, ज्या माणसाने पार्टी सुरू केली तो बाप माणूस आमच्याकडे आहे.

त्यामुळे आम्हाला भीती नाही. भाजपकडे पक्ष फोडण्याची ताकद असेल तर धनगर, लिंगायत आणि इतर समाजाला 50 टक्के पेक्षा जास्त आरक्षण देण्याची धमक त्यांच्याकडे नाही का?शेतकऱ्यांना न्याय देण्याची धमक, गुजरातमध्ये जात असलेल्या उद्योगांना थांबवण्याची धमक या भाजपमध्ये नाही का? येत्या काळात पक्ष मजबूतीसाठी राज्यभर दौरा केला जाणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. येत्या काळात "लढेंगे भी और जितेंगे भी". ज्या व्यक्तीने पक्ष सोडला, घर सोडलं त्यावर मी बोलू इच्छित नाही. येत्या काळात लोकांच्या मनातील पक्षाचे नाव आणि चिन्ह लवकरच देऊ. असे रोहित पवार म्हणाले.

Rohit Pawar : पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत रोहित पवार म्हणाले...
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर रोहित पवारांनी केला 'हा' फोटो ट्विट
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com