सत्तेसाठी गुवाहाटीत 'रेडा' बळी दिला, पण रेड्यानं उलटा शाप दिला; सामनातून हल्लाबोल

सत्तेसाठी गुवाहाटीत 'रेडा' बळी दिला, पण रेड्यानं उलटा शाप दिला; सामनातून हल्लाबोल

राज्यात एकापाठोपाठ एक राजकीय घडामोडी घडत आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राज्यात एकापाठोपाठ एक राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत युती सरकारमध्ये सामिल होत उपमुख्यमंत्रीपदाची रविवारी शपथ घेतली. त्यांच्यासोबत काही आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा अग्रलेख सामनातून टीका करण्यात आली आहे. सामनातून म्हटले आहे की, राज्यात एकापाठोपाठ एक राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत युती सरकारमध्ये सामिल होत उपमुख्यमंत्रीपदाची रविवारी शपथ घेतली. त्यांच्यासोबत काही आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. 'एक फुल, दोन हाफ' हा नवा चित्रपट राज्यात लागला आहे. पण लोकांचा त्यावर बहिष्कार आहे.

दिल्लीवाल्यांची लाथ आणि फडणवीसांचा बुक्का अशा कोंडीत ते सापडले. अजित पवार यांना मांडीवर घ्यायचे की पायाशी बसून रोज अपमानाचे घोट गिळायचे? असा पेचप्रसंग मिंधे गटाला पडलाय.अजित पवारांच्या शपथ ग्रहणानंतर मुख्यमंत्र्यांची मानसिक अवस्था सूरत, गुवाहाटीपेक्षा जास्तच बिघडली आहे. 'कालपर्यंत जे भ्रष्टाचारी होते तेच सरकारमध्ये गेल्याने त्यांच्यावरील आरोपांतून त्यांना मुक्त केले असेच समजायचे.' महाराष्ट्रात असे वातावरण कधीच नव्हते. विचारांची लढाई विचाराने लढण्याची परंपरा महाराष्ट्राची आहे. मोदी-शहा-फडणवीसांच्या व्यापारी राजकारणाने या परंपरेस चूड लावली आहे.

गृहमंत्री फडणवीस यांनी 'वर्षा' बंगल्यावरील सर्व शस्त्रे लगेच सरकारजमा केली पाहिजेत. महाराष्ट्राची सत्ता मिळावी म्हणून गुवाहाटीत जाऊन 'रेडा' बळी दिला, पण रेडय़ाने उलटा शाप दिल्याने मिंधे गटाची अवस्था विचित्र झाली आहे. राष्ट्रवादी आमच्याबरोबर सत्तेत सहभागी झाली तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असे गरजणारे मिंधे गटाचे सर्व प्रवक्ते अचानक गायब झाले आहेत. मुख्यमंत्र्यांची तर वाचाच गेली आहे. मिंध्यांचे एक मंत्री सावंतवाडीचे दिपू केसरकर यांनी पंधरा दिवसांपूर्वीच सांगितले होते, 'बंड फसले असते तर शिंदे यांनी स्वतःच्या डोक्यावर पिस्तुल चालवले असते. असे म्हणत सामनातून हल्लाबोल केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com