Anil Parab
Anil Parab Team Lokshahi

माजी परिवहन मंत्री अनिल परबांना मोठा दिलासा, साई रिसॉर्ट प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर

खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात परबांना हा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
Published by  :
Sagar Pradhan

महाविकास आघाडी सरकारमधील माजी मंत्री अनिल परब यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दापोलीमधील साई रिसॉर्ट प्रकरणीअडचणीत सापडलेल्या परब यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात परबांना हा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अनिल परब यांचे वकील अॅड. सुधीर बुटाला यांची जामिनासाठी केला होता अर्ज दाखल त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जामीन मंजूर केला आहे.

Anil Parab
"आयुष्याचा सट्टा खेळून आम्ही भाजपकडे आलो" गुलाबराव पाटलांचे मोठे विधान

दापोली रिसॉर्ट संदर्भातील कथित जमीन व्यवहार घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी परबांविरोधात पुरावे सादर करत हे प्रकरण लावून धरलं आहे. माजी मंत्री अनिल परब यांच्यासह तिघांवर आयपीएस कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली होती.

अनिल परब यांच्यावर फसवणूक आणि आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मंत्रिपदाचा दुरुपयोग करत शेतजमिनीवर तीन मजली रिसॉर्ट बांधल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. शेतजमिनीचे बिगर शेती जमिनीत रुपांतर केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर परब यांनी कदम यांना हे रिसॉर्ट विकल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com