साधा महाराष्ट्र सैनिक वरळीत तुम्हाला घरी बसवेल; संदीप देशपांडेंचा आदित्य ठाकरेंवर घणाघात

साधा महाराष्ट्र सैनिक वरळीत तुम्हाला घरी बसवेल; संदीप देशपांडेंचा आदित्य ठाकरेंवर घणाघात

मनसेचा गुढी पाडवा मेळाव्यात संदीप देशपांडेंचा ठाकरे गटावर सडकून टीका

मुंबई : उध्दव ठाकरे पाठीत खंबीर खुपसला, म्हणून रडत आहात. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. अमित ठाकरे जेव्हा गंभीर आजाराने त्रस्त होते. तेव्हा ५ कोटी देत मुंबई मनपात नगरसेवक फोडले. आज का रडता? अपयश आणि यश कुठल्या तराजूत मोजायचे. शिवसेनेचे ५६ आमदार आले पण ४० फुटले. आमचा एकच आहे राजूदादा. पण तो एकटाच काफी आहे, अशी सडकून टीका मनसे नेते संदीप देशपांडेंनी केली आहे. मनसेचा आज पाडवा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.

साधा महाराष्ट्र सैनिक वरळीत तुम्हाला घरी बसवेल; संदीप देशपांडेंचा आदित्य ठाकरेंवर घणाघात
नारायण राणेंना शिवसेना सोडायची नव्हती, पण...; राज ठाकरेंनी सांगितला 'तो' किस्सा

मनसेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०१४ साली पाठिंबा, तर २०१९ रोजी विरोध केला. मला माझ्या नेत्याचा अभिमान आहे. जेव्हा चांगले काम केले तेव्हा स्तुती केली. चुकीचे काम केले तेव्हा लाव रे तो व्हिडिओ म्हणत सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडली. तुम्ही आम्हाला भूमिकेबाबत बोलू नका. सत्तेसाठी पवारांच्या मांडीवर जाऊन बसलात, असा घणाघात संदीप देशपांडेंनी केला आहे.

महाबळेश्वर अधिवेशनात तुम्हाला कार्याध्यक्ष करण्याचा प्रस्ताव राज ठाकरे यांनी दिला. तुमच्याकडे कर्तृत्व नाही, म्हणून तुम्ही षडयंत्र केलं. राज ठाकरेंविरोधात तुम्ही षडयंत्र केलं. अशी परिस्थिती निर्माण केली की त्यांना बाहेर पडावे लागले.

मनसेला संपलेला पक्ष म्हणता. त्या आदित्य ठाकरेंना महाराष्ट्र सैनिक जागा दाखवतील. वरळीचे आमदार सेटिंग लावून झाला. पुण्याईमुळे आमदार झालात. २०२४ जवळ आहे. या संपलेल्या पक्षाचा एक साधा महाराष्ट्र सैनिक तुम्हाला घरी बसवून आमदार होईल, हे चॅलेंज देतो, असे आव्हान त्यांनी दिले आहे.

यांचे हिंदूत्व हे बोलण्यापुरते आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते मशिदीवरील भोंगे उतरवा. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर सैनिक रस्त्यावर उतरले आणि भोंगे उतरले. नुपूर शर्मा विरोधात पक्ष गेला, पण राज ठाकरे त्यांच्या पाठीशी उभे राहतील. येत्या निवडणुकीत राज ठाकरे सत्तेत दिसतील, ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे, असेदेखील संदीप देशपांडे यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com