न्यायव्यवस्थेला टाचेखाली ठेवण्याचा सत्ताधाऱ्यांच्या प्रयत्न; राऊतांचे टीकास्त्र

न्यायव्यवस्थेला टाचेखाली ठेवण्याचा सत्ताधाऱ्यांच्या प्रयत्न; राऊतांचे टीकास्त्र

किरेन रिजिजू यांच्या विधानावर संजय राऊतांनी मोदी सरकारला केले लक्ष्य

मुंबई : देशातील काही निवृत्त न्यायमूर्ती भारतविरोधी टोळीतील आहेत, असा गंभीर आरोप विधिमंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी एका कार्यक्रमात केला. यावरुन आता राजकारण तापले असून विरोधकांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. अशातच, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही जोरदार टीका केली आहे. देशाची न्यायव्यवस्था स्वतंत्र राहू नये ती टाचेखाली ठेवण्याचा सत्ताधाऱ्यांच्या प्रयत्न असल्याची टीका त्यांनी केली आहे.

न्यायव्यवस्थेला टाचेखाली ठेवण्याचा सत्ताधाऱ्यांच्या प्रयत्न; राऊतांचे टीकास्त्र
बावनकुळेंकडून जागा वाटप जाहीर! बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, युती नाही..

सरन्यायाधीशांवर काही बोलणार नाही. पण, केंद्रीय कायदामंत्री किरण रिजिजू कायम न्यायमूर्तींबद्दल सतत वादग्रस्त वक्तव्य करतात. काही माजी न्यायमूर्ती सरकार विरोधी विधान करतात, असे त्यांनी काल म्हंटले. पण, सरकार विरोधात बोलणं हा काही देशद्रोह नाही. असे बोलणे न्यायव्यवस्थेवर दबाव आहे. देशाची न्यायव्यवस्था स्वतंत्र राहू नये ती सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली राहावी. आमचा ऐकला नाही तर आम्ही बघून घेऊ. आम्हाला हवे तसे निर्णय द्या अशा प्रकारचे धमकी दिली जाते. राज्यपाल पद आणि बाकीचे पद देतो ती घ्या आणि गप्प बसा असे सुरु आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

हा कायदमंत्र्यांचा दबाव नाही तर काय? यंत्रणेला धक्का देणारा सरकार यालाच हुकूमशाही म्हणतात. राहुल गांधी यांनी यावरच आवाज उठवला ते योग्य. आणि तो आवाज उठवला आहे त्यामुळे राहुल गांधी यांचं लोकसभेचे सदस्य पद बाद करण्याची तयारी सुरू आहे त्यासाठी आम्ही आज दिल्लीत जात आहोत. हे सरकार सत्तेत आल्यापासून संविधान आणि कायदा मानत नाही हे स्पष्ट झालंय. न्यायव्यवस्था खिशात टाकण्याचा प्रयत्न सुरू आहेत. परंतु, देशात अजून असे काही न्यायाधीश उरलेले आहेत की जे सरकारच्या दबावाखाली येत नाहीत. त्यांना अशा प्रकारचा धमक्या दिल्या जातात, असेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, उध्दव ठाकरेंच्या सभेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज खेडमध्ये गोळीबार मैदानात जाहीर सभा आहे. यावर संजय राऊत यांनी खेडमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर कोकणातील चित्र स्पष्ट झालंय. आता कोणीही सभा घेतली तरी फरक पडत नाही. कोणाकणातील जनता कोणाच्या बाजूने आहे ते स्पष्ट झाले आहे, असा निशाणा शिंदेवर साधला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com