गद्दारांना त्याच खोक्याखाली चिरडायचे; राऊतांचे टीकास्त्र

गद्दारांना त्याच खोक्याखाली चिरडायचे; राऊतांचे टीकास्त्र

मालेगावमध्ये आज उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली आहे. यावेळी ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी निवडणूक आयोग आणि शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

नाशिक : मालेगावमध्ये आज उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली आहे. यावेळी ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी निवडणूक आयोग आणि शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. आपल्याला सुहास कांद्यांना, गुलाबराव पाटलांना रस्त्यांवर फेकायचे आहे आणि कांद्याला भाव द्यायचाय. ज्यांनी गद्दारी केली त्यांना त्याच खोक्याखाली चिरडायचे आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

गद्दारांना त्याच खोक्याखाली चिरडायचे; राऊतांचे टीकास्त्र
सत्तेची आलेली गर्मी महात्मा गांधींच्या विचाराने उतरवणार; पटोलेंचे मोदी सरकारवर टीकास्त्र

शिवसेना काय आहे हे पाहायचे आहे तर निवडणूक आयोगाने इकडे येऊन पाहावे. निवडणूक आयोगाच्या बापाला विचारून बाळासाहेबांनी शिवसेना काढली नाही. समोर असलेले प्रामाणिक निष्ठावंत शिवसैनिक आहे. महाराष्ट्रात शिवसेना पुन्हा एकदा भगवा फडकवेल आणि उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री करेल. कोणाची हिंमत आहे का लढण्याची, असे आव्हान संजय राऊतांनी दिले आहे.

मोसम पुलावर वाजत-गाजत शिवगर्जना करत इथपर्यंत पोहोचले. सकाळपासून ठाकरेंची तोफ धडाडणार अशा बातम्या होत्या. परंतु, या मालेगावचा ढेकूण चिरडायला तोफेची गरज नाही. मालेगावाला सभा होत आहे कारण या महाराष्ट्राला व देशाला संदेश देण्यासाठी की शिवसेना तुटलेली, वाकलेली नाही. तर सर्व धर्म-जाती धर्माचे लोक या शिवसेनेच्या मागे ठाम उभे आहेत, असे त्यांनी म्हंटले.

चिते की चाल, बाज की नजर, बाजीराव की तलवार और उद्धव ठाकरे की प्रामाणिकतेपर सवाल नही किया जा सकता, असा डायलॉग म्हणत संजय राऊत म्हणाले की, नीम का पता कडवा है... अशा घोषणा दिल्या जात होत्या. हा पता किती कडवा आहे ते आपल्याला दाखवायचं आहे. या राज्यात शेतकरी, कष्टकरी, बेरोजगांरांचे प्रश्न आहेत. कांद्याला भाव नाही. पण, आपल्याला सुहास कांद्यांना, गुलाबराव पाटलांना रस्त्यांवर फेकायचे आहे आणि कांद्याला भाव द्यायचाय. ज्यांनी गद्दारी केली त्यांना त्याच खोक्याखाली चिरडायचे आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

शिवसेनेचे चिन्ह व नाव चोरले. तरीही बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेना ठामपणे उभी आहे. त्यांच्या हातात भगवा आहे. पुन्हा एकदा आपलेच राज्य येईल. उध्दव ठाकरेच मुख्यमंत्री होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com