तिथे चिथा जळत होत्या मुंबईत मंत्री पेढे वाटत होते; संजय राऊतांची टीका

तिथे चिथा जळत होत्या मुंबईत मंत्री पेढे वाटत होते; संजय राऊतांची टीका

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. यावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना शिंदे - फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत म्हणाले की, शरद पवारांचे राजकारण संपवण्याचा भाजपाचा डाव आहे. अपघातग्रस्तांची चिता जळत असताना शपथविधी सुरु होता. तिथे चिथा जळत होत्या मुंबईत मंत्री पेढे वाटत होते. अपघातग्रस्तांचा चिता जळत असताना शपथविधी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. असे राऊत म्हणाले.

यासोबत राऊत म्हणाले की, भाजपा आणि अजित पवारांमध्ये सीएम पदासाठी करार झाला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलणार. शिंदे आता काही दिवसच सीएम राहणार आहेत. शिंदेंना हटवल्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री असणार. ईडीच्या भितीने शिंदे - अजित पवार सत्तेत आहेत. शिंदेंसह 16 आमदार अपात्र होणार. मुख्यमंत्री पदासाठी अजित पवारांनी ही डील केली आहे. असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com