Sanjay Raut
Sanjay RautTeam Lokshahi

'पराभवाच्या भीतीनं निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन'

संजय राऊतांची शिंदे-भाजपवर टीकास्त्र

मुंबई : भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवडची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली भाजपने उमेदवार जाहीर केले आहे. तर, महाविकास आघाडीनेही निवडणूक लढण्याची तयारी सुरु केली आहे. परंतु, मविआने निवडणूक न लढवण्याचे आवाहन शिंदे-भाजपकडून करण्यात येत आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सर्व पक्ष प्रमुखांना फोन केला होता. यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी भाष्य केले आहे.

Sanjay Raut
Kasba Peth, Chinchwad Bypolls : राज ठाकरेंचे मविआला आवाहन; ...तर जनताही सहानभूती दाखवणार नाही

मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न वाखाणण्यासारखे आहेत. मात्र, महाराष्ट्राचं राजकारण कोणी गढूळ केलं हेही लक्षात घ्यायला हवं. देवेंद्र फडणवीस यांनीही हे मान्य करून वातावरण चांगलं होण्यासाठी पुढाकार घेणार असं म्हटलं होतं. पुढे तसे कोणतेही प्रयत्न का झाले नाही, असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे. नांदेड, पंढरपूरमध्ये भाजपने परंपरा पाळली नाही. पराभवाच्या भीतीनं निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही, असेही त्यांनी ठासून सांगितले आहे.

भाजप आणि काँग्रेसनं उमेदवार जाहीर केले आहेत. चिंचवड जागेसाठी शिवसेना इच्छुक असून कसबा काँग्रेस लढणार हे आधीच ठरलं होतं. यां दोन्ही जागंमधील वातावरण भाजपला अनुकूल नाही. विधानपरिषद निवडणुकीत ते स्पष्ट झालंय. शिक्षक आणि पदवीधर यांचाही कौल हा मविआला मिळाला आहे. कसबा आणी चिंचवड निवडणूक होणार ही तर लोकांची ईच्छा आहे. बिनविरोध आवाहनासाठी मुख्यमंत्र्यांचा आम्हाला काही फोन नाही आणि येण्याची शक्यता नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, सिंधुदुर्गच्या आंगणेवाडी येथील भराडी देवी यात्रेला देवेंद्र फडणवीस यांनी काल हजेरी लावली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर आणि शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. पाच वर्षांच्या काळात आम्ही कोकणसाठी मोठा निधी दिला. परंतु, ठाकरे सरकारने कोकणसाठी एकही योजना आणली नाही. मात्र, भराडीदेवीनं आम्हाला कौल दिल्यामुळे आम्ही सत्तेत आलो आहोत, असे फडणवीसांनी म्हंटले होते. यावर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे. कोकणातील देव अधिक जागरूक असतात. भराडी देवी हे जागृत देवस्थान असून पापी लोकांना आशीर्वाद देत नाही, असा टोला शिंदे-फडणवीसांना लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com