राऊतांच्या 'त्या' दाव्यावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया; स्वतःच ठेवायंच झाकून...

राऊतांच्या 'त्या' दाव्यावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया; स्वतःच ठेवायंच झाकून...

संजय राऊत यांच्या विधानावर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे

सातारा : दिल्लीत मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरु असल्याचा मोठा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. यावर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली असून संजय राऊतांवर टीका केली आहे. दिल्लीतील गोष्टी समजायला संजय राऊत हे काय अंर्तयामी आहेत का, असा खोचक सवाल शंभूराज देसाई यांनी केला आहे.

राऊतांच्या 'त्या' दाव्यावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया; स्वतःच ठेवायंच झाकून...
मविआत बिघाडी? 'त्या' विधानावर शरद पवारांचे अखेर स्पष्टीकरण

भाजपाला जे हवं आहे ते साध्य करण्यात शिंदे अपयशी झाले आहेत. शिंदेमुळे भाजपा रसातळाला चालला आहे. सरकार जास्त दिवस चालू नये, हाच भाजपाचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली दिल्लीत सुरु झाल्या आहेत, असे संजय राऊत यांनी म्हंटले होते. यावरुन शंभूराज देसाईंनी राऊतांवर निशाणा साधला आहे.

दिल्लीतील गोष्टी समजायला संजय राऊत हे काय अंतर्यामी आहेत का? स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून असं संजय राऊत यांचं झालं आहे, अशा शब्दात त्यांनी राऊतांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. आम्ही सभागृहात 170 चे बहुमत 2 वेळा सिद्ध केले आहे. पुन्हा प्रस्ताव आला तरी 180, 185 चे बहुमत सिद्ध करू, असा दावाही शंबराज देसाई यांनी केला आहे.

दरम्यान, संजय राऊतांच्या वक्तव्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही टीका केली आहे. आमच्यात वितुष्ट करण्याचा प्रयत्न करत असेल तर कुणी यशस्वी होऊ शकत नाही. राऊतांचा पोकळ आत्मविश्वास आहे. संजय राऊत बोलघेवडे आहेत. एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांच्याकडे पाहिल्यावर कळेल कोण मर्द आहे तो, अशा शब्दात त्यांनी राऊतांवर घणाघात केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com