Shambhuraj Desai
Shambhuraj Desai Team Lokshahi

परवानगी मिळाली नसली तरी शिवतीर्थावर पहिला हक्क आमचा - शंभूराज देसाई

महाराष्ट्रातील शिवसैनिकांची खरी ताकद कोणाच्या मागे आहे, हे लवकरच दिसेल

राज्यात सध्या अभूतपूर्व राजकीय गोंधळ सुरु आहे. मात्र, अशातच शिवसेना आणि शिंदे गटात दसरा मेळाव्यावरून प्रचंड वादंग सुरु आहे. यावरूनच दोन्हीकडील नेत्यांकडून जोरदार आरोप- प्रत्यारोप होता आहेत. यावरच आता शिंदे गटातील आमदार आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी यासंबंधी प्रतिक्रिया दिली आहे.

Shambhuraj Desai
पावणेदोनशे जागा काँग्रेसनं जिंकल्या, नाना पटोलेंची माहीती

पुढील महिन्यात ५ तारखेला होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार जोरदार तयारी सुरु असून, हा मेळावा विक्रमी होईल, असा दावा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी बोलताना केला आहे. ते आज शिंदे गटाच्या हिंदू गर्व गर्जना कार्यक्रमासाठी आले असताना त्या कार्यकमात त्यांनी हे विधान केले.

ते म्हणाले की, अद्याप आम्हाला शिवतीर्थावर सभा घेण्याची परवानगी मिळाली नसली तरी आमचा पहिला हक्क शिवतीर्थावर असणार, असे देसाई यांनी स्पष्ट सांगितले. शिवतीर्थाला परवानगी न मिळाल्याने आम्ही पर्यायी व्यवस्था करून ठेवली असून तरी आम्ही शिवाजी पार्क मैदानावरील हक्क सोडला नसल्याचे, देसाई यांनी सांगितले.

Shambhuraj Desai
तुम्ही केलेल्या अभद्र युतीच्या विरोधात आमचा उठाव, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

दसरा मेळाव्याबाबत बोलत असताना त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, परवानगी न घेता दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याची भाष्य करणाऱ्यांनी कायदा काय आहे, तेही पाहावं. ते राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत, ते केवळ कौटुंबिक वारसदार म्हणून फायदा करून घेण्याचे काम करतात त्यांना वारसदार म्हणून या दसरा मेळाव्यानंतर महाराष्ट्रातील शिवसैनिकांची खरी ताकद कोणाच्या मागे आहे, हे मेळाव्यात दिसेल, असा थेट इशारा शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

Lokshahi
www.lokshahi.com