खारघर घटनेची न्यायाधीशांमार्फत चौकशी करा; शरद पवारांची मागणी

खारघर घटनेची न्यायाधीशांमार्फत चौकशी करा; शरद पवारांची मागणी

खारघर घटनेवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 15 श्री सदस्यांना उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. तर काही जणांवर उपचार सुरु आहेत. यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याची मागणी शरद पवारांनी केली आहे.

खारघर घटनेची न्यायाधीशांमार्फत चौकशी करा; शरद पवारांची मागणी
अब्रुनुकसानीच्या दाव्यानंतर नारायण राणे बॅकफुटवर? मी संजय राऊतांना ओळखतच नाही

'महाराष्ट्र भूषण' हा कार्यक्रम राज्यसरकारचा आहे. राज्यसरकारचा कार्यक्रम असतो त्यावेळी त्या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी निमंत्रित म्हणून शंभर टक्के राज्यसरकारची असते. मला केंद्रसरकारने 'पद्मविभूषण' पुरस्कार दिला. हा पुरस्कार घेण्यासाठी मला राष्ट्रपती भवनला जावे लागले. निमंत्रित केंद्रसरकार होते. हा पुरस्कार घेण्यासाठी माझ्या समवेत फक्त दहा लोक होते याची आठवण शरद पवार यांनी सरकारला करून दिली.

'महाराष्ट्र भूषण' हा कार्यक्रम धर्माधिकारी यांच्या सन्मानाचा होता. हा कार्यक्रम धर्माधिकारी यांच्या संघटनेने आयोजित केला नव्हता तर तो महाराष्ट्र सरकारने आयोजित केला होता. त्याठिकाणी लोक मृत्युमुखी पडले. केवळ राज्यसरकारने खबरदारी घेतली नसल्याने ते लोक मृत्युमुखी पडले. एवढा प्रचंड उन्हाळा.

उष्माघाताची शक्यता असताना हा कार्यक्रम उघड्यावर घेतला जातो याचा अर्थ सरकारला आपली प्रचंड शक्ती जमवून त्यातून अनुकूल वातावरण महाराष्ट्रात होऊ घातलेल्या निवडणूकीत करायचं होते मात्र यातून बेफिकीरपणा दाखवला गेला आणि त्याची किंमत काही निष्पाप लोकांना द्यावी लागली. याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शरद पवार यांनी केली.

या प्रकरणाचे गांभीर्य पाहिल्यानंतर याची चौकशी एका अधिकार्‍याने करावी म्हणून त्याची नेमणूक केली. तो अधिकारी स्वच्छ म्हणून त्याचा लौकिक आहे. परंतु शेवटी तो सरकारी अधिकारी आहे. तो आपल्या बॉस म्हणेल तसे करेल मग तो कितीही प्रामाणिक असला तरी सत्य पुढे येऊ शकणार नाही. त्यामुळे यासाठी हायकोर्टाच्या सिटींग न्यायाधीशांवर हे काम सोपवले पाहिजे आणि वस्तुस्थिती देशासमोर आली पाहिजे, अशी आग्रही मागणीही शरद पवार यांनी यावेळी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com