'मराठा क्रांती मोर्चा'चा व्हिडीओ शेअर केला? संजय राऊत म्हणाले...

'मराठा क्रांती मोर्चा'चा व्हिडीओ शेअर केला? संजय राऊत म्हणाले...

राऊतांनी मराठा क्रांती मोर्चाचा व्हिडीओ ट्वीट केल्याचा दावा भाजप आणि मराठा क्रांती मोर्चाकडून केला आहे. याला आज संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिले आहे.

नागपूर : महाविकास आघाडीच्या महामोर्चाला शिंदे-फडणवीस सरकारने नॅनो मोर्चा म्हंटल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटरवर मोर्चाचे व्हिडीओ शेअर करत प्रत्युत्तर दिले होते. परंतु, राऊतांनी मराठा क्रांती मोर्चाचा व्हिडीओ ट्वीट केल्याचा दावा भाजप आणि मराठा क्रांती मोर्चाकडून केला जात आहे. यावर आज संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिले आहे.

'मराठा क्रांती मोर्चा'चा व्हिडीओ शेअर केला? संजय राऊत म्हणाले...
अधिवेशनाआधी विरोधकांच्या '50 खोके एकदम ओके'च्या घोषणा; तर रोहित पवार अन् मिटकरींची अनोखी गांधीगिरी

संजय राऊत म्हणाले की, मराठा समाजाचा मोर्चा आमचा नव्हता का? मी कधीच म्हटलं नाही की, तो मोर्चा महाविकास आघाडीचा होता. हे लोक त्याला नॅनो मोर्चा म्हणतायत. मी दोन्ही मोर्चांचे व्हिडिओ टाकले. दोन्ही मोर्चे राज्याच्या स्वाभिमानासाठी होते. त्यासाठी भाजपला इतकी टिका करण्याचं कारण नाही. माझं ट्विट नीट पाहा, वाचा मी काय म्हटलंय. तोही मोर्चा आमचाच होता, महाराष्ट्राचाच होता. त्यानं आणि कालच्या मोर्चानंही महाराष्ट्राची ताकद दिल्लीला दाखवलीय, असे त्यांनी म्हंटले आहे.

'मराठा क्रांती मोर्चा'चा व्हिडीओ शेअर केला? संजय राऊत म्हणाले...
कर्नाटक मुख्यमंत्र्यांचे अकाउंट फेक तर ते ट्विट डिलीट का केले नाही; अशोक चव्हाणांचा सवाल

भाजपने छत्रपतींच्या नादाला लागू नये. आपण सगळे महाराजांचे मावळे आहोत. राज्यात महाराजांचा अपमान होत असताना त्यांनी योग्य भूमिका घ्यायला हवी. जशास तसं उत्तर योग्य त्या मुद्यांवर द्यायला हवं. विरोधकांना बोलू दिलं नाही तर राज्यकर्त्यांना राज्य करण्याचा अधिकार नाही. शाहु, फुलेंचा अपमान करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. बेळगाव मुद्यावर आज जशास तसं उत्तर देऊ म्हणणाऱ्यांची तोंड बंद का झाली. आता जैसे थे परिस्थिती राहिलेली नाही. सीमाभागाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय पोलिसांना द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com