राऊतांनी बाळासाहेबांच्या मुलाला आणि नातवाला राष्ट्रवादीकडे गहाण टाकले; शिंदे गटाचे प्रत्युत्तर

राऊतांनी बाळासाहेबांच्या मुलाला आणि नातवाला राष्ट्रवादीकडे गहाण टाकले; शिंदे गटाचे प्रत्युत्तर

संजय राऊतांच्या टीकेला शिंदे गटाचे उत्तर

मुंबई : ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीकास्र सोडलं आहे. मिंधे गट आधी बाप पळवायचे, आता मुलंही पळवायला लागले, असे ते म्हणाले. याला शिंदे गटाने प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी बाळासाहेबांच्या मुलाला आणि नातवाला राष्ट्रवादीकडे गहाण टाकले, अशी जोरदार टीका शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली आहे.

राऊतांनी बाळासाहेबांच्या मुलाला आणि नातवाला राष्ट्रवादीकडे गहाण टाकले; शिंदे गटाचे प्रत्युत्तर
जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकार सकारात्मक, संप मागे घ्या; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

संजय राऊत यांनी बाळासाहेबांचे विचार विकले. बाळासाहेबांच्या मुलाला आणि नातवाला राष्ट्रवादीकडे गहाण टाकले. शिवसेना पक्ष तुम्ही राष्ट्रवादीला विकला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चोराच्या तावडीतून बाळासाहेबांचे विचार धनुष्यबाण आणि शिवसेना सोडवून घेतलेली आहे. चोराच्या उलट्या बोंबा ही जी म्हण आहे ना हे तुमच्याकडे बघितले तर हे सत्य आणि जाणीव होते, असा खोचक टोला नरेश मस्के यांचा संजय राऊत यांना लगावला आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

मिंधे गट कधी बाप पळवतात. आता मुलंही पळवायला लागले आहेत. त्यांची ही मेगा भरती सुरू आहे, ती कुचकामी आहे. उदय सामंत यांनी काही महिन्यांपूर्वी भूषण देसाईंवर काही आरोप केले होते. त्यांच्या चौकशीचे आम्ही आदेश दिले आहेत, असंही त्यांनी सांगितलं होतं. मात्र, त्यांनी आता भूषण देसाई यांना भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून आपल्या बाजूला बसवले आहे. ही भाजपाच्या वॉशिंग मशीनची कमाल आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com