Sanjay Raut
Sanjay RautTeam Lokshahi

संजय राऊत इतके अभद्र बोलतात की...; शिंदे गटाच्या नेत्याची टीका

संजय राऊतांविरोधात नाशिक व ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला उत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यांविरोधात अपशब्द वापरले. याविरोधात शिंदे गट आक्रमक झाला असून नाशिक व ठाण्यात राऊतांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अशातच, शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत इतके अभद्र बोलतात की दररोज त्यांच्यावर एक गुन्हा दाखल होईल, अशी टीका त्यांनी केली आहे.

Sanjay Raut
संजय राऊतांनाच विचारा डिल झालेले पैसे कुठं ठेवलेत; गुलाबराव पाटलांचा राऊतांवर निशाणा

शिवसेनेचे चिन्ह हे बाळासाहेबांच्या विचारांची ओळख आहे हे मिळाल्याचा आनंद आहे. संजय राऊत इतके अभद्र बोलतात की दररोज त्यांच्यावर एक गुन्हा दाखल होईल. राऊत जे निवडणूक आयोगावर पैशांचा आरोप करतात. ते काय मोजायला होते का? एक हुशार माणूस आम्ही त्यांच्याकडे बघत होतो. ते कशात हुशार आहे ते आता कळालं, असा टोला सदा सरवणकर यांनी राऊतांना लगावला आहे.

दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची आज महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. शिवसेनेचे विधानसभा प्रतोद भरत शेठ गोगावले यांनी ही बैठक बोलवल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीमध्ये व्हीपसंदर्भातही चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना बैठकीचा विषय माहित नाही, पण अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा होईल, असे सदा सरवणकर यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com