शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या सुपुत्राचा ट्रॅक्टर गेला चोरीला

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या सुपुत्राचा ट्रॅक्टर गेला चोरीला

सातारा पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा आला नोंदविण्यात

छत्रपती संभाजी नगर : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या सुपुत्राचा ट्रॅक्टर चोरीली गेल्याची घटना घडली आहे. संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत यांच्या मालकीचा पाच लाख रुपयांच्या किमतीचा ट्रॅक्टर चोरट्यांनी लंपास केला आहे. सातारा पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास सुरु झाला आहे.

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या सुपुत्राचा ट्रॅक्टर गेला चोरीला
आदित्य ठाकरे माझे मुलाच्या वयाचे...; गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर

संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट माजी नगरसेवक राहिले आहेत. सिध्दांत शिरसाट यांनी पाच लाख रुपयांच्या किमतीचा ट्रॅक्टर त्यांच्या व्यवसायासाठी खरेदी केला होता. व सातारा परिसरातील तंत्रज्ञनगर येथे ट्रॅक्टर पार्क केला होता. येथूनच चोरट्यांनी ट्रॅक्टर लंपास केला आहे. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, आमदाराच्या मुलाचाच ट्रॅक्टर सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य माणसांची काय परिस्थिती असेल, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, सिध्दांत शिरसाट मध्यंतरी व्हायरल ऑडीओ क्लिपमुळे चर्चेत आले होते. वाढदिवसाच्या पार्टीचं बिल मागणाऱ्या एका केटरिंग व्यावसायिकाला सिध्दांत शिरसाट यांनी चक्क हातपाय तोडण्याची धमकी दिली होती. विशेष म्हणजे याबाबत एक कथित ऑडीओ क्लिप देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यात सिद्धांत शिरसाट यांच्याकडून केटरिंग व्यावसायिक त्रिशरण गायकवाड यांना धमकी देण्यात आल्याचा दावा केला जात होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com