...म्हणून किरीट सोमय्या माझा भाऊ : किशोरी पेडणेकर

...म्हणून किरीट सोमय्या माझा भाऊ : किशोरी पेडणेकर

राज्यभरात दिवाळी उत्साहात साजरी होत असून आज भाऊबीज व पाडवा आहे. यानिमित्त शिवसेना (ठाकरे गट) नेत्या किशारी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मुंबई : राज्यभरात दिवाळी उत्साहात साजरी होत असून आज भाऊबीज व पाडवा आहे. यानिमित्त शिवसेना (ठाकरे गट) नेत्या किशारी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यंदा भाऊबीजेला एका डोळ्यात हसू, एका डोळ्यात रडू आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. राणा माझा भाऊ कधीही नव्हता. किरीट सोमय्या माझा भाऊ आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

...म्हणून किरीट सोमय्या माझा भाऊ : किशोरी पेडणेकर
ठाकरे गटाला मोठा धक्का! अडीच लाख प्रतिज्ञापत्र बाद

किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, लग्न झालं तेव्हा सख्खे-चुलत कुणीही भाऊ आले नाहीत. त्यामुळं आमच्या चाळीत हनुमानाचं मंदिर होतं. तो माझा पाठीराखा आहे. तो चिरंजिवी आहे, भाऊ म्हणून मी तुझा स्वीकार केलाय तुही माझा स्वीकार कर रक्षा कर. मी आव आणत नाही हनुमानाच्या भक्तीचा, असे म्हणत त्यांनी राणा दाम्पत्याला टोला लगावला आहे.

शिंदे गटासंदर्भात प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, शुभेच्छा दिल्याच पाहिजे. यंदा भाऊबीजेला एका डोळ्यात हासू, एका डोळ्यात रडू आहे. ज्यांनी विश्वासघात केला त्याचं दुःख पण आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. त्याच त्याच लोकांच्या जागी आता नव्या पिढीला नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार, अशी माहिती त्यांना मिळणार आहे. तर, विरोधी पक्षात रवी राणा माझा भाऊ कधीही नव्हता. किरीट सोमय्या माझा भाऊ आहे. त्यांनी पक्षाचं काम चोख केलं, अशी खोचक प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.

...म्हणून किरीट सोमय्या माझा भाऊ : किशोरी पेडणेकर
गणपतीत, मग नवरात्रीत अन् आता दिवाळीत फिरतायेत, काम... : आदित्य ठाकरे

तर, लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा दौरा करणार आहेत. यावर किशोरी पेडणेकरांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी राज्याच्या दौऱ्याला जायलाच हवं, सरकार आहे. त्यात ढोल कशाला वाजवून जायला हवं, असा सवाल त्यांनी विचारला आहे. हे दोन देव ठरवणारेत की महाराष्ट्रात इलेक्शन कधी होणार. निवडणूक होऊ द्या. मग लोकशाही काय आहे ते दिसेल, असेही त्यांनी म्हंटले आहे.

ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने आज मोठा धक्का देत तब्बल अडीच लाख प्रतिज्ञापत्र बाद आयोगाने बाद ठरवली आहेत. यासंदर्भात बोलताना पेडणेकर म्हणाल्या, आमचा न्यायदेवता, कोर्टावर विश्वास आहे. बाकी दबावतंत्र आपण पाहतोच आहोतच, अशी अप्रत्यक्ष टीकाही भाजपवर केली आहे.

संजय राऊतांविषयी बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, विसरले तर आठवण येईल. आमच्या हृदयात ते कायम आहेत. संजय राऊत यांच्याकडे कायम जाते. याचवर्षी नाही. पण, ते नेहमी सामनाच्या कार्यालयात असतात आज नाहीत. पण, मी त्यांच्या कुटुंबाला नेहमीप्रमाणे जरूर भेटायला जाणार, असे त्यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com