शिंदे गटात गेलेले सगळे चोर, लफंगे आणि कचरा; संजय राऊतांचा घणाघात
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गटावर जोरदार घणाघात केला आहे. शिंदे गटाला कचरा गोळा करायची सवय आहे. कचऱ्या समोर मुख्यमंत्री भाषण करतात. शिंदे गटात गेलेले सगळे चोर, लफंगे आणि कचरा, त्याला आग लागते आणि धुर निघतो, असा घणाघात त्यांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, समृद्धीच्या टक्केवारीतून पक्ष बनत नाही. पक्ष हा रक्त घामातून बनतो. मुख्यमंत्र्यांनी बोलावे, असे अनेक विषय आहेत. योगी आदित्यनाथ पाच लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रातून नेली आणि आमच बिऱ्हाड जर्मनीला गुंतवणूक आणण्यासाठी जाताय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर त्यांची वाचा गेले होती. भाजपाला छत्रपती शिवाजी महारांजाबद्दल कधीच प्रेम नव्हते. त्यांच्यासोबत मोंदीचे तुलना करणारे बॅनर लागले होते.
आज सकाळी मी नारायण राणेंना उत्तर दिल्यापासून त्यांनी माझी ओळख देण बंद केले. हे त्यांच्या प्रकृतीसाठी चांगले आहे. त्यांनी माझ्यांशी ओळख काढण्याचा प्रयत्न केला तर माझ नाव संजय राऊत आहे. राणे तुम्ही गुंड, तर मी महागुंड. कुठे येऊ, मी कुणालाही घाबरणार नाही. कुठल्याही एजन्सीला घाबरत नाही, असा सज्जड दमच त्यांनी राणेंना दिला आहे.