Ambadas Danve
Ambadas Danve Team Lokshahi

सध्याचे सरकार भूखंड लाटणाऱ्यांच्या बाजूचे, दानवेंचा शिंदे- फडणवीस सरकार निशाणा

40 जणांनी गद्दारी केली. शिवसेना संपणार नाही. 140 जागा निवडुन आणण्याची ताकद उद्धव ठाकरे यांच्या मनगटात आहे, असा इशारा दानवे यांनी दिला.

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये विविध विषयावरून जोरदार आरोप- प्रत्यारोप होताना दिसत आहे. त्यातच राज्याचे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. विद्यमान सरकार भूखंड लाटणाऱ्यासह गायरान जमिनी हडप करणाऱ्यांच्या बाजूचे आहे. अशी टीका त्यांनी यवतमाळमध्ये बोलत असताना केली.

Ambadas Danve
तुम्ही तोंडात बोळा कोंबल्याशिवाय काहीच शक्य नाही, भातखळकरांचा राऊतांवर निशाणा

काय म्हणाले दानवे?

यवतमाळ येथे मोर्चा काढण्यात येणार आहे आणि त्याला जनतेचा पाठींबा मिळत असल्याचे बघून काहींच्या पोटात दुखायला लागले. त्यांनी सल्ले द्यायला सुरुवात केली. येथील काही भामटे त्यावेळी सरकार मध्ये होते. विद्यमान सरकार भूखंड लाटणाऱ्यासह गायरान जमिनी हडप करणाऱ्यांच्या बाजूचे आहे, असा निशाणा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी साधला. यवतमाळ येथे आक्रोश मोर्चाला संबोधित करताना मंत्री संजय राठोड यांचे नाव न घेता निवडणुकीत घरी बसवण्याचे आवाहन केले. 40 जणांनी गद्दारी केली. शिवसेना संपणार नाही. 140 जागा निवडुन आणण्याची ताकद उद्धव ठाकरे यांच्या मनगटात आहे, असा इशारा दानवे यांनी दिला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com