kirit somaya
kirit somaya Team Lokshahi

सोमय्या यांच्या पत्नीची तक्रार पडणार महागात; राऊतांविरुद्ध आणखी एक खटला

कथित शौचालय घोटाळा प्रकरणी संजय राऊतांविरोधात मानहानीचा खटला
Published by :
Sagar Pradhan

शिवसेनेचे नेते संजय राऊत हे पत्राचाळ प्रकरणी सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. संजय राऊतांविरोधात आणखी एक खटला चालणार आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी कथित शौचालय घोटाळा प्रकरणी संजय राऊतांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. संजय राऊत यांनी शंभर कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप सोमय्या यांच्यावर केला होता. त्यावरून मेधा यांनी राऊत यांच्याविरोधात शिवडी कोर्टात मानहानीचा दावा केला. यावर आज कोर्टात सुनावणी पार पडली. ईडीच्या अटकेत असल्याने राऊत यांना व्हिडिओ कॉन्फर्नसिंगच्या माध्यमातून सुनावणीसाठी हजर करण्याचे आदेश महानगरदंडाधिकारी पी. आय. मोकाशी यांनी आर्थर रॉड कारागृहाला दिले होते. त्यानंतर राऊत यांना व्हिडिओ कॉन्फर्नसिंगच्या माध्यमातून शिवडी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. राऊत सर्व आरोप फेटाळून आरोप अमान्य असल्याचे सांगितले. त्यामुळे आता 19 सप्टेंबर रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.

kirit somaya
काळ्या दाढीवाल्याचा महाराष्ट्रावर प्रभाव तर पांढऱ्या दाढीवाल्यांचा देशभर, भुजबळांची टोलेबाजी

काय नेमकं प्रकरण ?

संजय राऊत यांनी शंभर कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप सोमय्या यांच्यावर केला होता. त्यावरून मेधा यांनी राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा केला. राऊत हे मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयात हजर होऊ शकले नाहीत. कोर्टाने ईडीला आदेश द्यावे आणि संजय राऊत यांना जवाबासाठी हजर करावे अशी मागणी मेधा सोमय्या यांनी केली होती.

राऊतांनी हे केले सामोय्यावर आरोप ?

मीरा भाईंदर महापालिका आणि राज्यात हा काही कोटींचा टॉयलेट घोटाळा केला असल्याचा दावा राऊतांनी केला. सोमय्या हे युवा प्रतिष्ठान नावाची प्रतिष्ठान चालवत होते. त्यांनी खोटी बिलं देऊन पैसे उकळले. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याची कारणं दाखवून हा घोटाळा केला. एकूण 100 कोटींचा हा घोटाळा युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्रीमती सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबाने केलेला हा घोटाळा केल्याचा दावा राऊतांनी केला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com