Sanjay Shirsat | siddhant Shirsat
Sanjay Shirsat | siddhant ShirsatTeam Lokshahi

'हातपायच तोडतो बेट्या' पार्टीचे बिल मागणाऱ्या व्यावसायिकाला शिंदे गटातील आमदार पुत्राची धमकी

आमदारसाहेबांसोबत बोलणी झालं त्यावेळी ४० हजार ठरलं होतं. पण बाहेर आल्यावर मला २० हजार रुपयेच दिले आहेत.

शिंदे गटातील एका आमदार पुत्राची धमकी देणारी ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाढदिवसाच्या पार्टीचे बिल मागणाऱ्या केटरिंग व्यवसायिकाला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांच्या मुलाने हातपाय तोडण्याची धमकी दिली आहे. शिंदे गटातील नेत्यांनी या आधीही धमक्या दिल्याच्या, मारहाण केल्याचा घटना घडल्या होत्या. त्यामुळे या क्लिपची प्रचंड चर्चा होत आहे.

Sanjay Shirsat | siddhant Shirsat
शिंदे गटात नाराजी, अब्दुल सत्तारांचे खळबळजनक विधान; म्हणाले, माझ्या पक्षातील लोक...

केटरिंग व्यवसासिक आणि सिद्धांत शिरसाठ यांच्यातील संभाषण

सिद्धांत शिरसाठ : बोला

केटरिंग व्यवसायिक : आमदारसाहेबांसोबत बोलणी झालं त्यावेळी ४० हजार ठरलं होतं. पण बाहेर आल्यावर मला २० हजार रुपयेच दिले आहेत.

सिद्धांत शिरसाठ : साहेबांनी जेवढे सांगितले होते, तेवढेच दिले. विषय संपला आता.

केटरिंग व्यवसायिक : भाऊ अजून वीस हजार रुपये बाकी आहे ना भाऊ.

सिद्धांत शिरसाठ : मूड खराब करायचा नाही हं आता.

केटरिंग व्यवसायिक : भाऊ कामाचे पैसे तुमच्याकडे बाकी आहेत, असं नका ना करू. तुमच्या एका शब्दावर तुमचे ७५ हजार रुपये रिटर्न केले.

सिद्धांत शिरसाठ : उपकार केले ना तू.

केटरिंग व्यवसायिक : भाऊ तशी नका भाषा वापरू. तेवढे कामाचे पैसे देऊन टाका.

सिद्धांत शिरसाठ : कोणत्या कामाचे पैसे.

केटरिंग व्यवसायिक : त्याच कामाचे. तसे एक लाख २५ हजार रुपये होते. पण तुमच्या शब्दावर ७५ हजार रुपये डिस्काउंट केले.

सिद्धांत शिरसाठ : तू ना आता जरा त्याच्यावर वरच झाला. साहेबांसमोर तुला वीस हजार रुपये दिले.

केटरिंग व्यवसायिक : साहेबांनी ४० हजार रुपये देण्याचे कबूल केले हेाते. पण बाहेर आल्यावर माझ्या हातावर वीसच हजार रुपये देण्यात आले.

सिद्धांत शिरसाठ : मग, तू का नाही त्यावेळी बोलला.

केटरिंग व्यवसायिक : बरं, परत यायला लागेल ऑफीसला. मग आता काय करणार...

सिद्धांत शिरसाठ : ऑफीसला परत आला तर तुझे हातपायच तोडतो बेट्या...

केटरिंग व्यवसायिक : भाऊ असं नका ना बोलू तुम्ही.

सिद्धांत शिरसाठ : असं नका बोलू म्हणजे.

केटरिंग व्यवसायिक : कामाचे पैसे तेवढे देऊन टाका ना. तुम्हाला घाबरायचे पैसे मागतोय का.

सिद्धांत शिरसाठ : कुणाचं देणं आहे. रे. कुठाय तू आता.

केटरिंग व्यवसायिक : घरी होतो.

सिद्धांत शिरसाठ : थांब येतो तिथं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com