रोज सकाळी ९ वाजता अनेकांचे १२ वाजवणारे...; रोहित पवारांच्या राऊतांना वाढदिवसांच्या खास शुभेच्छा

रोज सकाळी ९ वाजता अनेकांचे १२ वाजवणारे...; रोहित पवारांच्या राऊतांना वाढदिवसांच्या खास शुभेच्छा

शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ असलेले फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत यांचा आज 63 वा वाढदिवस साजरा करत आहे.

मुंबई : शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ असलेले फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत यांचा आज 63 वा वाढदिवस साजरा करत आहे. कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली आहे. तर, अनेक नेत्यांनीही संजय राऊतांना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी संजय राऊतांना खास शुभेच्छा दिल्या आहेत.

रोज सकाळी ९ वाजता अनेकांचे १२ वाजवणारे...; रोहित पवारांच्या राऊतांना वाढदिवसांच्या खास शुभेच्छा
कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा रहात नाही; रोहित पवारांचा शिंदे-फडणवीसांवर निशाणा

रोहित पवार म्हणाले की, रोज सकाळी ९ वाजता अनेकांचे १२ वाजवणारे आणि 'मोडेल पण वाकणार नाही, कुणापुढं झुकणार नाही', हा मराठी बाणा जगणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खा. संजय राऊ यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! चुकीच्या गोष्टींविरोधात लढण्यासाठी आपल्याला निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, मागील अनेक महिन्यांपासून संजय राऊत हे गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणात कोठडीत होते. परंतु, 100 दिवसानंतर अखेर संजय राऊत यांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. यानंतरही रोहित पवारांनी ट्विट केले होते. या ट्विटची प्रचंड चर्चा झाली होती. त्यात त्यांनी एक वाघाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये असं दिसते की एक वाघ पिंजऱ्यातून बाहेर येतो. त्यावर त्यांनी लिहिले की, #सत्यमेवजयते! सोबतच संजय राऊत यांना त्या ट्विटमध्ये पवार यांनी टॅग केले आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com