पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना जामीन मंजूर

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना जामीन मंजूर

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली

खासदार संजय राऊत यांना अखेर पीएमएल कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं राऊतांच्या जामीन अर्जावरी आपला निर्णय राखून ठेवला होता. आजच्या सुनावणीकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. मात्र संजय राऊत यांना आता जामीन मंजूर झाला आहे. 100 दिवसानंतर संजय राऊत यांना जामीन मिळाला आहे. संध्याकाळपर्यंत ते तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता आहे. मात्र संजय राऊत यांच्या जामीनाला ईडीकडून विरोध करण्यात येत आहे. जामीनाला स्थगिती देण्याती ईडीनी कोर्टात मागणी केली आहे. ईडी आता संजय राऊत यांच्या जामीनाविरोधात हायकोर्टात जाणार आहे.

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी तपास यंत्रणेचे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा संजय राऊत यांच्यावतीने करण्यात आला होता. अलिबाग येथे जमीन खरेदी करण्यात आली होती. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचं नाव सुरुवातीला समोर आलं होतं आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती, ते प्रविण राऊत हे फक्त नावालाच होते, या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊतच आहेत, असा दावा ईडीकडून करण्यात आला होता. सातत्याने संजय राऊतांनी जामिनासाठी अर्ज केले होते. मात्र, प्रत्येक वेळी त्यांचे अर्ज फेटाळण्यात आले होते. त्यामुळे संजय राऊतांची दसरा-दिवाळीही तुरुंगातच गेली. आता अखेर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com