पंतप्रधान मोदी म्हणजे रावण! काशीनंतर पंढरपूर उद्ध्वस्त करण्याचा डाव : सुब्रमण्यम स्वामी

पंतप्रधान मोदी म्हणजे रावण! काशीनंतर पंढरपूर उद्ध्वस्त करण्याचा डाव : सुब्रमण्यम स्वामी

वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले पंढरपूर येथे कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. वाराणसीच्या धर्तीवर हा कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले पंढरपूर येथे कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. वाराणसीच्या धर्तीवर हा कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. पंढरपूर विकास आराखड्यामध्ये पहिल्यांदा मंदिराचा गाभा, मग मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे. परंतु, या कॉरिडॉरला स्थानिकांनी विरोध केला आहे. तर, राजकीय वर्तुळातूनही टीका करण्यात येत आहे. पंढरपूर कॉरिडॉरला विरोध खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रावण असे संबोधले आहे.

पंतप्रधान मोदी म्हणजे रावण! काशीनंतर पंढरपूर उद्ध्वस्त करण्याचा डाव : सुब्रमण्यम स्वामी
समृद्धी महामार्गामुळे मराठवाड्यातील विकासाला चालना मिळणार - भागवत कराड

सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, रावणसारखे मोदी धार्मिक असल्याचा दावा करून उत्तराखंडमध्ये वाराणसीप्रमाणे मंदिरे पाडत आहेत किंवा बळकावत आहेत आणि आता पंढरपूरच्या पवित्र स्थळांची नासधूस करण्याची योजना फडणवीस यांच्यासोबत आखत आहेत. त्यामुळे हा संहार रोखण्यासाठी मी लवकरच मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमोल मिटकरी यांनीही पंढरपूर कॉरिडॉरवरुन शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. वारकऱ्यांची लाखो मतं मिळवण्यासाठी भाजपने पंढरपुरात कॉरिडॉरचा घाट घातला जात आहे. मंदिरं आणि मठ पाडून असा कोणता विकास करणार आहेत, असा सवाल उपस्थित त्यांनी केला. तसेच, आगामी हिवाळी अधिवेशनात पंढरपूरच्या कॉरिडॉरचा मुद्दा मांडणार असल्याचेही अमोल मिटकरी यांनी सांगितले.

कशी आहे पंढरपूर कॉरिडॉरची योजना?

पंढरपूर कॉरिडॉरसाठी सुमारे २ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. विकासकामात पुरातत्त्व खात्याच्या मदतीने विठ्ठल मंदिराची दुरुस्ती, नवे दर्शन मंडप, स्कायवॉक, नऊ वाहनतळे, रस्ते रुंदीकरण आदींचा समावेश आहे. प्रदक्षिणा मार्गावरील रस्ते, पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार, पालखीतळ, वाहनतळ, उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. प्रदक्षिणा मार्ग ते मंदिर परिसरात २१ रस्ते तर पंढरपूर शहरात १७ नवीन रस्ते करण्यात येणार आहेत. यामध्ये काही रस्त्यांची रुंदी वाढवण्यात येणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात 72 हजार स्क्वेअर फुट तर दुसऱ्या टप्प्यात 39 हजार स्क्वेअर फुट जमीन ताब्यात घेण्यात येणार आहे. मंदिर परिसरातील जवळपास तीन एकर रहिवासी आणि व्यापारी जागा या प्रस्तावित पंढरपूर कॉरिडॉरमध्ये जाणार आहे. परंतु, या कॉरिडॉरमुळे सातशे कुटुंब बाधित होणार आहेत. शिवाय व्यापार्‍यांच्या समोर पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. यामुळे स्थानिक नागरिकांनी विरोध केला असून वारकरी संप्रदायानेही या कॉरिडॉरला विरोध करून मंदिरासमोर भजन आंदोलन केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com