शरद पवारांचे नियोजित कार्यक्रम रद्द; सुप्रिया सुळेंनी दिली प्रकृतीबाबत महत्वाची माहिती, म्हणाल्या...

शरद पवारांचे नियोजित कार्यक्रम रद्द; सुप्रिया सुळेंनी दिली प्रकृतीबाबत महत्वाची माहिती, म्हणाल्या...

शरद पवार यांना शनिवारी अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तात्काळ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली होती. याबाबत राष्ट्रवादीच्या खायदार सुप्रिया सुळेंनी माहिती दिली आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

बारामती : शरद पवार यांना शनिवारी अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तात्काळ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली होती. शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं असून त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे शरद पवार यांनी पुरंदर तालुक्यातील आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. याबाबत राष्ट्रवादीच्या खायदार सुप्रिया सुळेंनी माहिती दिली आहे.

शरद पवारांचे नियोजित कार्यक्रम रद्द; सुप्रिया सुळेंनी दिली प्रकृतीबाबत महत्वाची माहिती, म्हणाल्या...
Video : सणासुदीमुळे रेल्वे स्थानकांवर गर्दी; सुरतमध्ये चेंगराचेंगरी, एकाचा मृत्यू

शरद पवार यांची प्रकृती ठीक आहे. बारामतीकरांचं आणि संपूर्ण महाराष्ट्राच प्रेम आणि आशीर्वाद हेच पवार साहेबांचं टॉनिक आहे. तुम्हीच डॉक्टर आहात तुम्हीच औषध आहात. आणि तुम्हीच टॉनिक आहात, असे सुप्रिया सुळेंनी म्हंटले आहे. डॉक्टरांनी सांगितला आहे ते घरीच लोकांना भेटू शकतात. बाहेरचा प्रवास टाळायला सांगितला आहे आणि आज-उद्या प्रवास करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

तसेच, अनेकदा सांगते वय वाढल की वैचारिक प्रगल्भता वाढली पाहिजे. नाती एका जागेवर आणि राजकीय भूमिका एका जागेवर असते. आमची लढाई वैचारिक आहे. आमची लढाई वैयक्तिक नाही. भाजप पक्षातील अनेक मोठ्या नेत्यांचे भाजपसोबतच्या नेत्यांबरोबर कौटुंबिक संबंध आहेत. अटल बिहारी वाजपेयी, मुंडे कुटुंब, अरुण जेटली यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक वर्षाचे संबंध आहेत. राजकीय मतभेद नक्की आहेत, मात्र देशातील कोणत्याही कुटुंबासोबत आमचे मनभेद नाहीत, असेही सुप्रिया सुळेंनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com