शकुनी प्रवृत्तीचे लोक त्यांच्याबरोबर, त्यामुळे डाव जिंकतील पण...; सुषमा अंधारेंचे शिंदे गटावर टीकास्त्र
मुंबई : शिंदे गटाच्या 16 आमदार अपात्रतेप्रकरणी आज सुनावणी पार पडली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज सुनावणी झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे आणि ठाकरे गटाला आपलं म्हणणं मांडण्यासाठी आठवडभराचा वेळ दिला आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राहुल नार्वेकर आणि शिंदे गटावर टीकेची तोफ डागली आहे.
राहुल नार्वेकर अध्यक्ष आहेत हे विसरलात का? असा प्रश्न सुषमा अंधारेंनी केला आहे. तुम्ही-आम्ही सर्व प्रयत्न केलेले आहेत. बाकी त्यांना काय निर्णय घ्यायचे ते घेऊ देतं. शकुनी प्रवृत्तीचे लोक त्यांच्या बरोबर आहेत त्यामुळे डाव जिंकतील. पण, निवडणूकीच्या कुरुक्षेत्र जेव्हा आम्ही उतरू तेव्हा विजय आमचा असेल, असा विश्वाय अंधारेंनी व्यक्त केल आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या विधानावर त्या म्हणाल्या, धार्मिक स्थळ याबाबत त्यांनी मांडलेली भूमिका योग्य आहे. पण, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतील भत्तुले भाजपचे काही प्रेड डोनर्स लावारिस फक्त मंदिर मंदिर ओरडत आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांची भूमिका फक्त मंदिरपर्यंत नसून सर्व धार्मिक स्थळांबाबत त्यांनी भूमिका व्यक्त केली आहे. कारण आतापर्यंत भाजपची मोनो पॉलिसी पाहता धार्मिक स्थळांवरून दंगली होऊ शकतात. त्यामुळे आंबेडकर यांच्या मताशी मी सहमत असल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हंटले आहे.